Sex Life esakal
आरोग्य

Sex Life: लग्नानंतर रोज शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं का? याबाबत तज्ज्ञ सांगतात..

रोज सेक्स केल्याने वजन वाढतं असे अनेक महिलांना वाटते

सकाळ डिजिटल टीम

Sex Life: लग्न झालेल्या नवीन तरूण तरूणींना शारीरिक संबंधांबाबत अनेक प्रश्न पडतात. आठवड्यातून किती वेळा सेक्स केलेला चांगला, सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती, कशा पद्धतीने सेक्स केला तर आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो अशा अनेक प्रश्नांचा समावेश त्यात असू शकतो. त्यातही लग्नानंतर वजन वाढलेल्या अनेक तरूणींना आपले लग्नानंतर नियमित सेक्स केल्याने वजन वाढले आहे असेही सतत वाटत असते.

लग्नानंतर होणारे शारीरिक संबंध खरं तर फार महत्वाचे असतात. मानसिक स्थिरता, हॉर्मोनल चेंज यासाठी नवरा बायकोमध्ये शारीरिक संबंध असणे फार महत्वाचे असते. पण अनेकींना लग्नानंतर सेक्समुळे वजन वाढते असे वाटते. आता हे कितपत खरंय ते जाणून घेणे महत्वाचे ठरते.

सेक्स आणि वजन यांचा काय संबंध?

प्रसिद्ध लैंगिक व वैवाहिक तज्ज्ञ सांगतात, स्त्रीयांचे वजन वाढण्याचा लैंगिक संबंधांशी काहीही संबंध नाही. वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र सेक्स केल्याने वजन वाढतं हा मुळात गैरसमज आहे. स्त्रियांना उद्भवणाऱ्या अनेक समस्यांमुळे वजन वाढू शकतं. पीसीओडी, प्रीमॅच्युअर मेनोपॉज किंवा अनियंत्रित डाएट यामुळेही स्त्रीयांचं वजन वाढू शकतं. वजन वाढण्यामागे आरोग्याच्या बऱ्याच समस्याही जबाबदार असू शकतात. अनेकदा मानसिक ताणतणावामुळेही वजन वाढतं.

शारीरिक संबंधाचे फायदे की तोटे?

शारीरिक संबंधाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक संबंधांमुळे शरीरात हॉर्मोन्सची निर्मिती होते. या हॉर्मोन्समुळे आपल्याला मानसिक समाधान मानसिक शांती मिळते. आपला आत्मविश्वास वाढतो. शारीरिक संबंधांमुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते. एवढंच नाही तर रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. शारीरिक संबंधांमुळे पचनक्रिया सुधारण्याबरोबरच त्वचादेखील उजळ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : सबरीमाला प्रकरण: एसआयटीने माजी टीडीबी अध्यक्ष पद्मकुमार यांना केली अटक

SCROLL FOR NEXT