Is It Safe To Use Contraceptive Pills For Years sakal
आरोग्य

Birth Control Pills And Fertility: दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर गर्भधारणेवर होतो का परिणाम? डॉक्टर सांगतात...

Is It Safe To Use Contraceptive Pills For Years: अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक गर्भनिरोधक उपलब्ध आहेत. गर्भनिरोधक गोळ्या सोप्या असल्या तरी भविष्यात प्रेग्नंसीवर परिणाम होतो का, जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

How Long Does It Take To Get Pregnant After Stopping Birth Control Pills: आजकाल अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक प्रकारचे गर्भनिरोधक (कॉन्‍ट्रासेप्टिव्ह) उपलब्ध आहेत; जसे की कॉपर टी, कंडोम, किंवा बर्थ कंट्रोल पिल्स. पण काही महिला गर्भनिरोधक गोळ्या घेणे पसंत करतात, कारण त्या वापरणे सोपे असते. पण अनेकदा मनात भीती असते की या गोळ्या घेतल्यामुळे भविष्यात आई होण्यास अडचण तर येणार नाही ना? चला तर मग याचे उत्तर पुढे जाणून घेऊया.

डॉक्टरांचं मत काय आहे?

डॉ. एम. व्ही. ज्योत्स्ना, या हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्समधील गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर (फर्टिलिटीवर) वाईट परिणाम होत नाही.

या गोळ्यांमध्ये असणारे हार्मोन्स म्हणजेच एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हे काही काळासाठी अंडोत्पादन (ओव्ह्युलेशन) थांबवतात. पण जेव्हा गोळ्या घेणे बंद केले जाते, तेव्हा शरीरातील हार्मोनचे संतुलन हळूहळू पूर्ववत होते. बहुतांश महिलांमध्ये काही महिन्यांत पाळी नियमित होते आणि गर्भधारणेची शक्यता पुन्हा वाढते.

काही महिलांमध्ये होणाऱ्या संभाव्य समस्या

कधी कधी काही विशिष्ट गोळ्यांमुळे ओव्ह्युलेशन पुन्हा सुरू होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो; कदाचित 6 महिने ते 1 वर्ष. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आई होऊ शकत नाही. हे बदल कायमस्वरूपी नसतात.

महत्त्वाचे म्हणजे

तुमचे जर वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि गर्भधारणा करण्यात अडचण येत असेल, तर इतर वैद्यकीय कारणेही कारणीभूत असू शकतात. त्यामुळे गोळ्या सुरू करण्यापूर्वी आणि प्रेग्नंसी प्लॅन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थोडक्यात...

काही महिलांमध्ये थोडा वेळ लागतो, पण हे सामान्य आहे. शरीराचे नैसर्गिक चक्र हळूहळू पूर्ववत होते. परंतु गर्भनिरोधक गोळ्या घेणे थांबवल्यावरही जर प्रेग्नंसी प्लॅन करताना अडचण येत असेल तर डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर म्हणाले अर्ध्या तासात अ‍ॅडमिट करा… पण पुण्याच्या ट्रॅफिकने घेतला जीव; आता रिक्षावाले काकाच बनले ट्रॅफिक पोलीस

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! कृष्ण जन्माष्टमी अन् दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत झालेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Virender Sehwag: 'धोनीने टीम इंडियातून बाहेर केल्यावर निवृत्ती घेणार होतो, पण तेंडुलकरने मला...', सेहवागचा धक्कादायक खुलासा

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT