Bone Fragility sakal
आरोग्य

Bone Fragility : हाडांची ठिसूळता

हाडांची ठिसूळता महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तीन पटीने जास्त असते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अजय कोठारी

Bone Fragility : आपल्या इमारतीच्या बांधकामासाठी सिमेंट कमी प्रतीचे वापरले असल्यास ती लवकरच ढासाळेल. त्याचप्रमाणे आपल्या हाडामध्ये कॅल्शिअमची कमतरता असल्यास त्यामध्ये वारंवार फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढेल. हाडांची ठिसूळता महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तीन पटीने जास्त असते.

कारणे

आहार

  • प्रथिनांची कमतरता असलेला आहार

  • पॅकड् फूड, फास्ट फूडचा अतिवापर

  • कॅल्शिअमची कमतरता असलेला आहार.

  • दारू, सिगारेट, तंबाखू यांचे प्रमाणाबाहेर व्यसन

  • बैठी जीवनशैली

  • मैदानी खेळ न खेळणे

  • लठ्ठपणा

  • महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते किंवा ज्या महिलांची गर्भाशयाची पिशवी काढली जाते, त्या महिलांमध्ये इस्ट्रोजेल, प्रगास्ट्रिरोरिन हार्मोन कमी होत असल्याने हाडांमध्ये ठिसूळता वाढते.

  • कॅल्शिअम व ‘व्हिटॅमिन डी-३’ची कमतरता

  • स्टेरॉईडचा अतिरिक्त वापर

  • आनुवंशिकता

लक्षणे

  • थकवा

  • कमजोरी

  • हाड आणि सांध्यांमध्ये वेदना

  • वारंवार फ्रॅक्चर होणे

  • कुबड निर्माण होणे

निदान कसे करायचे

डेक्सा स्कॅन ही सर्वांत अचूक निदान करणारी टेस्ट आहे. त्यामध्ये ‘टी’ स्कोअर २.५ पेक्षा कमी असल्यास त्याच्या हाडांमध्ये ठिसूळता आहे असे समजते.

रक्त ः ‘कॅल्शिअम, ‘व्हिटॅमिन डी-३’, अल्कलाईन फॉस्फेट तपासणी क्ष-किरण

उपचार

  • लवकरात लवकर केलेल्या निदानामुळे औषधोपचार करणे शक्य होते.

  • कॅलशिअमयुक्त आहार व औषध

  • ‘व्हिटॅमिन डी-३’ साठी सकाळचे उन्ह १ तास घेणे.

  • बिशफॉस्फोनेट गोळ्या महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेणे.

कसे टाळावे?

  • नियमित व्यायाम, योगा प्राणायाम, चालणे, जॉगिंग, सायकलिंग, मैदानी खेळ खेळणे.

  • पौष्टिक आहार ः दूध, सुकामेवा, नाचणी सत्त्व याचा आहारात समावेश करणे

  • हिरव्या भाज्या ः पालक, मेथी, फळे केळी, डाळिंब, अंजीर, सीताफळ याचाही आहारात समावेश करणे.

  • ताणतणाव, व्यसनापासून दूर राहणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT