Retina sakal
आरोग्य

संवाद : झिजणारे नेत्रपटल

नेत्रपटल (रेटिना) हा कॅमेऱ्यातील फिल्मप्रमाणे असतो. बाहेरून डोळ्यांत येणारी किरणे नेत्रपटलावर पडतात. तेथे प्रतिमा तयार होते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अक्षय कोठारी

नेत्रपटल (रेटिना) हा कॅमेऱ्यातील फिल्मप्रमाणे असतो. बाहेरून डोळ्यांत येणारी किरणे नेत्रपटलावर पडतात. तेथे प्रतिमा तयार होते. ती प्रतिमा नेमकी कोणती आहे, याचे ज्ञान होण्यासाठी नेत्रपटल ती ऑप्टिक नर्व्हद्वारे मेंदूकडे पाठवतो. नेत्रबिंदू किंवा दृष्टिबिंदू मॅक्युला हा नेत्रपटलावरचा केंद्रबिंदू असतो. त्याच भागावर आपल्या दृष्टीची स्पष्टता अवलंबून असते.

नेत्रपटलाची झीज होणे म्हणजे काय?

वयोमानानुसार नेत्रपटलाची झीज होणे याला वैद्यकीय परिभाषेत ‘एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन’ (एएमडी) असे म्हणतात. वय वर्षे ५० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांची दृष्टी कमी होण्यामागे ‘एएमडी’ हे एक महत्त्वाचे कारण ठरते. यामुळे डोळ्याच्या दृष्टिपटलावरील मॅक्युलाची झीज होते. त्यामुळे समोरची वस्तू स्पष्ट दिसण्यात अडथळा निर्माण होतो. या प्रक्रियेत रुग्णाला कोणत्याच वेदना होत नाहीत, पण मॅक्युलाच्या पेशींचा नाश होतो. ‘एएमडी’मुळे रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांवर कमी-जास्त प्रमाणात परिणाम होताना दिसतो.

‘एएमडी’चे प्रकार

ड्राय : यात मॅक्युलामधील प्रकाशास संवेदनशील असणाऱ्या पेशी हळूहळू विघटित होत जातात. यात शक्यतो दृष्टिदोष तीव्र स्वरूपात नसतो.

वेट : यात मॅक्युलाखालील अशा रक्तवाहिन्यांची वाढ होऊन नेत्रपटलाच्या पेशींना हानी पोहोचते. या नवीन रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव होतो. त्यातून तीव्र दृष्टिदोषाची शक्यता वाढते.

लक्षणे कोणती?

  • चष्मा लावल्यानंतरही मध्यभागी दृष्टी धूसर होणे

  • वाचताना डोळ्यांवर ताण येणे

  • चेहरे ओळखण्यास त्रास होणे

  • काम करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी जास्त प्रकाशाची आवश्यकता भासणे

  • सरळ रेषा वाकड्या दिसणे

निदान कसे करतात?

या नेत्रविकाराच्या निदानासाठी नजरेची, डोळ्यांचा दाब व पडद्याची तपासणी केली जाते. आजार बळावण्यापूर्वी नेत्रतज्ज्ञांकडून नियमित डोळे तपासणी करणे आवश्यक ठरते.

ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी : मॅक्युलाशी संबंधित समस्यांचे अचूक निदान यातून होते. यातून दृष्टिपटलची मायक्रोस्कोपिक स्तरावर तपासणी करता येते. अवघ्या काही क्षणांमध्ये हे उपकरण रुग्णाच्या दृष्टिपटलाची तपशीलवार माहिती देते. यातून रुग्णाच्या डोळ्यांच्या पडद्याच्या ठेवणीची व जाडीची माहिती मिळविता येते. तसेच, उपचारांनंतरच्या परिणामांचा अंदाज बांधता येतो.

फ्लुरोसिन ॲन्जिओग्राफी : या तपासणीमध्ये रुग्णाला शिरेद्वारे औषधांचे इंजेक्शन दिले जाते. कॅमेऱ्याच्या मदतीने नियमित कालांतराने दृष्टिपटलाची छायाचित्रे घेतली जातात. यामुळे नेत्रतज्ज्ञांना पडद्यामागे होणाऱ्या स्रावाचा आणि दृष्टिपटलावरील खराब झालेल्या रक्तवाहिन्या नेमक्या कुठे आहेत, याची माहिती मिळते.

उपचारांचे पर्याय कोणते आहेत?

लवकर निदान आणि योग्य उपचारपद्धतीमुळे ‘एएमडी’ला प्रतिबंध करता येतो. अर्थात त्यासाठी शक्य तितक्या लवकर निदान केल्यास दृष्टी कायम राखण्यात यश मिळते.

ड्राय एएमडी उपचार

नियमित तपासणी, औषधे

वेट एएमडी उपचार

डोळ्यांत इंजेक्शन देणे : डोळ्याच्या पांढऱ्या भागातून आतील भागातील जेलीमध्ये इंजेक्शन दिले जाते. ॲन्टी व्हीईजीएफ औषध इंजेक्शनमधून द्यावे लागते. सुरुवातीला प्रत्येक महिन्याला एक अशी तीन वेळा इंजेक्शन घ्यावी लागतात. रुग्णाची सध्याची दृष्टी वाचविणे हा याचा मुख्य उद्देश असतो.

फोटो डायनॅमिक थेरपी : यात एक औषध रक्तवाहिन्यांमध्ये सोडले जाते. हे औषध म्यॅक्युलाखाली जमा होते. त्याद्वारे पुढील उपचार केले जातात.

(लेखक ‘एनआयओ’मध्ये नेत्रतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT