dr kiran pathak writes Ajwain Aids in digestion sakal
आरोग्य

पचनास मदतशील ओवा

आपल्या सगळ्यांच्या या सामुदायिक अनुभवापेक्षा मी या ओव्याशी एका वेगळ्याच अनुभवानं जोडले गेले

सकाळ वृत्तसेवा

आपल्या सगळ्यांच्या या सामुदायिक अनुभवापेक्षा मी या ओव्याशी एका वेगळ्याच अनुभवानं जोडले गेले

डॉ. किरण पाठक

Ajwain : ओ वा म्हटलं, की आपल्याला त्याच्या पानांची केलेली भजी नक्कीच आठवतात. विशेषतः श्रावणधारेत चिंब भिजून आल्यावर या गरमागरम भज्यांची लज्जत औरच. आपल्या सगळ्यांच्या या सामुदायिक अनुभवापेक्षा मी या ओव्याशी एका वेगळ्याच अनुभवानं जोडले गेले.

साधारण १९९२-९३ची गोष्ट. मी केरळमधील एका विख्यात आयुर्वेद सेंटरमध्ये ट्रेनी म्हणून अनुभव घेण्यासाठी गेले होते. तिथं उपचारांसाठी येणारे बरेचसे रुग्ण विदेशी विशेषतः युरोप आणि अमेरिका खंडातून येणारे.

या प्रदेशातील खूप थंड हवामान सहन होत नसावं म्हणून की काय क्रोनिक ब्रोंकाइटिस, अस्थमा असणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच होती. अशा रुग्णांना पंचकर्म आणि औषधोपचार आयुर्वेद पद्धतीनं सुरू असायचे. सगळं काही शिस्तीत सुरू असलं तरीही त्याकाळी मी तुलनेने जुनियर डॉक्टर..

त्यामुळे सीनियर डॉक्टरांचा राऊंड झाला, की ही सगळी मंडळी ‘डॉक्टर वुई वॉंट युवर हर्बल सिगार,’ अशी मागणीच करायचे. त्यांच्या या चमत्कारिक मागणीनं सुरुवातीला मला आश्चर्याचा धक्का बसत असे; परंतु चार-पाच दिवसानंतर आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली ‘धूमवर्ती’ हे लोक मागत होते हे माझ्या लक्षात आलं आणि त्यासोबतच ‘अरेच्चा ही धूमवर्ती..!

ओवा, राळ आणि आणखीन काही महत्त्वाच्या आयुर्वेदिक औषधांपासून बनवलेली!’ हे माझ्या लक्षात आलं. अर्थातच छातीत साठलेला कफ पातळ करण्याची कमाल या धूमवर्तीमधे होती आणि त्यामुळे तिची मागणी होत होती.

आपल्या परसदारात सहज उगवणाऱ्या वनौषधीला पाश्चात्त्य लोकांची एवढी मागणी आहे, हा मला तिथं खरंतर शोधच लागला होता. त्याचबरोबर आपल्याकडे प्रचलित असलेली बाळंतपणानंतर बाळ आणि बाळंतिणीला धुरी देण्याची पद्धत, बाळंतिणीला चिमूटभर ओवा चावून खायला द्यायची पद्धत किती शास्त्रशुद्ध आहे हेही मला त्या विदेशी लोकांच्या मागणीनं तीव्रतेनं जाणवलं.

या ओव्याचं आयुर्वेदशास्त्रानं ‘यवानी’ असं नामाभिधान केलेलं आहे. शिवाय याचे ‘यवानी’ म्हणजे ज्याला आपण ‘अजवायन’ म्हणतो हा एक प्रकार (Carum capticum), तर ‘पारसिक यवानी’ हा दुसरा प्रकार (Artimesia maritima), ‘अजमोदा’ हा तिसरा प्रकार (Apium graveolens) आणि ‘किरमाणी ओवा’ हा चौथा प्रकार असे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे औषधी गुण सविस्तर सांगितलेले आहेत.

आपल्या घरगुती वापरासाठी आपण ओवा आणि अजमोदा हे प्रकार सहज वाढवू शकतो. ओव्याची पानं सहज कच्ची चावून खाल्ली, तरीदेखील आपल्या पोटामधील गॅसेस कमी करायला मदत करतात. ही पानं उत्तम प्रमाणात पाचक रसांचं स्त्रवण करतात.

‘दीप्यक’ म्हणजे अग्नीदीपन करणारा हे त्याचं संस्कृत नाव पुरेसं सूचक आहे. पोटातील गॅससाठी काळे मीठ, हिंग आणि ओवा असं एकत्र घेऊन त्यानंतर गरम पाणी प्यावे (carminative), हाही एक उत्तम उपाय आहे.

काहीसा तिखट कडवट आणि तुरट चवीचा ओवा सांध्यातील वेदना कमी करणारा (anti-inflamatory) आहे. त्यामुळे सांधेदुखी असल्यास ओव्याच्या पुरचुंडीनं त्या ठिकाणी शेक द्यावा. मायग्रेनसारख्या आजारात ओवा हुंगण्यासाठी देतात. यापासून निघणारे तेल म्हणजे यवानी तेल हे अनेक आजारांमध्ये वेदनाशमन करण्यासाठी वापरले जाते.

अजवायन फुल किंवा सत्व हेच थायमाल (Thymol) हे जंतुनाशक (antihelmenthic) आहे. आपल्याकडे नवजात बालकाला पाण्यामध्ये ओव्याचे आणि वावडिंगचे काही दाणे टाकून ते पाणी उकळून नंतर लहान मुलांना पाजण्याची पद्धत आहे. ती किती शास्त्रशुद्ध आहे हे यावरून लक्षात येईल.

आपल्या हवामानात सहजासहजी वाढणारी, अगदी मध्यम आकाराच्या कुंडीतही लावता येणारी, सदाहरीत अशी ही औषधी वनस्पती आपल्या बाल्कनीतील बगीचा जरूर जोपासूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT