Bones Exercises sakal
आरोग्य

Bones Exercises : हाडांच्या आरोग्यासाठी व्यायाम

योगिक आसने एक प्रकारचा व्यायामच आहे. परंतु, अस्थिरोगाच्या रुग्णांनी व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. अन्यथा दुखापत होण्याचा धोका असतो.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. पराग संचेती

अनेक दुर्धर आजारांचे प्राथमिक कारण म्हणजे दैनंदिन शारीरिक हालचाली न करणे आणि संतुलित आहाराचा अभाव होय. शारीरिक हालचाली कमी झाल्यास आजारांची लक्षणे सुरू होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढतात. त्यावरील गुणकारी उपाय म्हणजे नियमित व्यायाम. निष्क्रियतेमुळे शरीराचे कार्य बिघडते.

दैनंदिन आहारात प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्त्वे व खनिजांच्या अभावाने अस्थिविकार सुरू होतात. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे व्यायाम हाच आहे. व्यायामामुळे भूक नियंत्रित राहते, मन प्रसन्न होते. पुरेशी झोप होते.

शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. परिणामी, हृदयरोग, अर्धांगवायू, मधुमेह, स्मृतिभ्रंश, नैराश्य, संधिवात, ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. हाडे व स्नायूंचे आरोग्य सुदृढ ठेवतात. त्यामुळे विविध अस्थिरोगांच्या मुक्तीसाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे.

खबरदारी आणि संयम

व्यायामाचे विविध प्रकार आहेत. शरीराला आरोग्यवर्धक करणारे व्यायाम सक्रिय, सहाय्यक किंवा निष्क्रिय स्वरूपाचेही असू शकतात. प्रत्येक व्यायामाची वेगवेगळ्या परिस्थितीत विशेष योगदान असते.

योगिक आसने एक प्रकारचा व्यायामच आहे. परंतु, अस्थिरोगाच्या रुग्णांनी व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. अन्यथा दुखापत होण्याचा धोका असतो. खबरदारी व संयम ही सुरक्षित व्यायामाची गुरुकिल्ली आहे.

व्यायामाची गती, तीव्रता व कालावधी हळूहळू वाढविला पाहिजे. संतुलित शारीरिक व्यायाम आणि आहारामुळे अस्थिरोगाची व्याधी दूर झाल्याचे फायदे सिद्ध झाले आहे.

ऑस्टिओपोरोसिस प्रतिबंध आणि उपचार

ऑस्टियोपोरोसिस हा आता केवळ वृद्ध लोकांचा आजार राहिला नाही. हा आजार तरुण, मध्यमवयीनांमध्येही येत आहे. प्रथिने, कॅल्शिअम व जीवनसत्त्वांची आहारातील कमतरता, जीवनशैली, नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे हा आजार सामान्य होऊ लागला. वार्धक्यामुळे हाडे खूप कमकुवत आणि नाजूक होतात.

या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस असे म्हटले जाते. अशा प्रकारचा आजार रजोनिवृत्तीनंतर महिला आणि वृद्धापकाळातील पुरुषांमध्येही आढळतो. हाडे पातळ आणि कमकुवत होण्याच्या या आजाराने हाडे तुटण्याचा धोका अधिक असतो.

हाडे एक जिवंत ऊतक

तंदुरुस्ती अस्थिरोगांना प्रतिबंधित करते. लहान असताना मजबूत हाडे तयार करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो. आपण मोठे होतो तेव्हा हाडांची मजबुती टिकवून ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते.

हाडे एक जिवंत ऊतक असल्याने आपण नियमितपणे व्यायाम करतो, तेव्हा आपली हाडे व स्नायू हाडांमध्ये अधिक पेशी तयार करतात. स्नायूंमध्ये अधिक जाड व दाट तंतू तयार होतात. हाडांच्या निर्मितीसाठी वजन उचलणे ही एक प्रमुख प्रेरणा आहे. चालणे, धावणे आणि खेळ नवीन हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक उत्तेजन देतात. ऑस्टियोपोरोसिसच्या उपचारासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार, कॅल्शिअम सप्लिमेंटेशन, ॲनाबॉलिक हार्मोन्स, व्हिटॅमिन डी, ॲलेंड्रोनेट अत्यंत आवश्यकता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT