metabolic disease sakal
आरोग्य

संवाद : आता लढा चयापचयाच्या आजाराशी!

चयापचयाशीसंबंधी आजार याला वैद्यकीय परिभाषेत मेटॅबोलिक सिंड्रोम म्हणतात.

डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन

चयापचयाशीसंबंधी आजार याला वैद्यकीय परिभाषेत मेटॅबोलिक सिंड्रोम म्हणतात. हा सर्वांत घातक आजार आहे. मेटॅबोलिक सिंड्रोम म्हणजे नेमके काय, असा प्रश्न सामान्यतः विचारला जातो. वेगवेगळे आजार एकत्र आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला मेटॅबोलिक सिंड्रोम म्हणतात.

यात पोटचा घेर जास्त असणे किंवा पोटात फॅटचे प्रमाण खूप जास्त असणे, रक्तदाब सामान्यपेक्षा जास्त असणे, कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा वाढलेले असणे आणि ट्रायग्लिसराईज आणि फास्टिंग ब्लड शुगर वाढलेली (मधुमेहाचे निदान होते) असणे अशी लक्षणे दिसतात. यापैकी कोणतेही तीन आजार एकत्र आल्यास त्याला मेटॅबोलिक सिंड्रोम म्हटले जाते. हे सर्व आजार एकत्र आल्यानंतर रुग्णाला हृदयविकार, अर्धांगवायू, अँथ्रसक्लुरॉसिस असे आजार होण्याची शक्यता वाढते.

कोणाला सर्वाधिक धोका?

पोटाचा घेर ८० ते ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त असल्यास मेटॅबोलिक सिंड्रोमचा धोका वाढलेला असतो. रुग्णाचे वजन त्याच्या सामान्य वजनापेक्षा १५ ते २० किलोने वाढलेले असेल आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला याआधी मधुमेहाचे निदान झालेले असल्यास अशा रुग्णांना मेटॅबोलिक सिंड्रोम होण्याची शक्यता वाढलेली असते. अशा रुग्णांना आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

मेटॅबोलिक सिंड्रोम होण्याचे मुख्य कारण म्हणजे पोटात जमा झालेले फॅट आहे. पोटातील फॅट वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव तयार करते. त्याच्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. इन्शुलिन रेजिस्टंट होण्याचा धोका असतो.

ऑथोरेसक्ल्युरासिस वाढते. आपल्या शरीरातील आवश्यक असलेले ‘एचडीएल कोलेस्टेरॉल’चे प्रमाण कमी होते. या सर्व घटकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. पोटातील फॅट वाढल्याने घोरण्याचा आजार होऊ शकतो. त्याचाही थेट परिणाम हृदयविकाराचा शक्यता वाढण्यावर होतो.

उपाय काय?

पोटाचा वाढलेला घेर कमी करणे, हा मेटॅबोलिक सिंड्रोमवरील सर्वांत प्रभावी उपाय आहे. रुग्णाने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. आहारात कार्बोहायड्रेट, तेल, साखर याचे प्रमाण अत्यंत कमी ठेवणे.

तसेच, प्रथिने आणि तंतूमय पदार्थांचे (फायबर) प्रमाण वाढविणे असे बरेच वर्ष सातत्याने जीवनशैलीत बदल केल्यास मेटॅबोलिक सिंड्रोम कमी होतो. हा आजार थोडाही नियंत्रित झाल्यास त्याचा फायदा हृदयविकार टाळण्यासाठी होतो. आताच्या काळात अनेक औषधे उपलब्ध झाली आहेत. ती प्रभावी ठरू शकतात.

बलून थेरपी हा देखील एक उपाय आहे. मेटॅबोलिक सिंड्रोम या सर्वांनी नियंत्रित होऊ शकत नसेल, पोटाचा घेर वाढत असेल, मधुमेहाचे प्रमाण वाढत असेल तर दुर्बिणीतून मेटॅबोलिक आणि बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करून रूग्ण या आजारापासून मुक्त होऊ शकतो. यामुळे एचडीएल कोलेस्टेरॉल वाढते.

ट्रायग्लिसराईड कमी होते. रक्तदाब सामान्य होतो. विशेषतः टाइप-२ डायबेटीसमुळे इन्शुलिन सुरू असलेल्या रुग्णाचा या उपचाराचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसते. भारतात मेटॅबोलिसक सिंड्रोमचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर हा आजार दिसत होता. आता तो तिशी-पस्तीशीत होतो. नवीन पिढीमध्ये हा आजार त्याहून लवकर होण्याची भीती आहे. त्यामुळे या मेटॅबोलिक सिंड्रोमबद्दल सर्वांना जाणीव शास्त्रीय माहिती आवश्यक आहे. त्यातून या आजारावर वेळेत निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय करता येईल.

(लेखक बेरियाट्रिक सर्जन, एलओसी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT