dibites  sakal
आरोग्य

आरोग्यमंत्र : तुमचा मधुमेह कोणत्या प्रकारात मोडतो?

या प्रकारात तुमची रोग प्रतिकारक शक्ती अज्ञात कारणांमुळे तुमच्या स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करते.

सकाळ वृत्तसेवा

डॉ. सिंपल कोठारी

मधुमेह ही सामान्य स्थिती असून सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकते. ‘टाईप-२’ म्हणजे ‘प्रकार-२’ हा सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येतो. मधुमेहाचे प्रकार हे मधुमेह कशामुळे झाला आहे त्यानुसार ठरवले जाते.

टाईप-१ : या प्रकारात तुमची रोग प्रतिकारक शक्ती अज्ञात कारणांमुळे तुमच्या स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करते. इन्शुलिनच्या अभावाने शरीरातील रक्ताची शर्करा वाढते व मधुमेह होतो. हा सहसा लहान मुलांना किंवा तरुण वयात होऊ शकतो. या प्रकारात वजन कमी होणे, उलट्या, पोटदुखी लक्षणे त्वरित दिसतात. त्यावर तातडीने उपचारांची गरज असते.

टाईप-२ : या प्रकारात तुमचे शरीर पुरेसे इन्शुलिन तयार करत नाही किंवा तुमच्या शरीराच्या पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. हा प्रामुख्याने प्रौढावस्थेत होतो, परंतु मुलांनाही होऊ शकतो. स्थूल व्यक्तींमध्ये हा मधुमेह दिसून येतो. शरीराच्या काही भागांवरील त्वचा काळी पडते.

दीड-लाडा : ‘टाईप-१ मधुमेहाप्रमाणेही स्वयं रोगप्रतिकारक प्रतिक्रियेमुळे उद्‍भवतो. परंतु ‘टाईप-१’ पेक्षा खूपच हळू विकसित होतो. ‘लाडा’चे निदान झालेले लोक सहसा ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात. निदान झाल्यावर त्यांना वर्ष-दीड वर्षात इन्शुलिन सुरू करावे लागते.

मोनोजेनिक : तरुणवयाच्या सुरुवातीस होणारा हा मधुमेह आनुवंशिक उत्परिवर्तनामुळे उद्‍भवतो. त्यामुळे तुमचे शरीर इन्शुलिन कसे बनवते आणि वापरते त्यावर परिणाम करते. हा वयाच्या ३० वर्षाअगोदर होतो आणि आनुवंशिक असू शकतो. हे लोक बारीक किंवा दिसायला सामान्य असतात.

गरोदरपणातील मधुमेह : हा प्रकार सहसा गर्भधारणेनंतर निघून जातो. तथापि हा मधुमेह असलेल्या व्यक्तीस ‘टाईप-२’ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. प्लेसेंटा हार्मोन्स सोडते ज्यामुळे इन्‍शुलिनचा प्रतिकार होतो व मधुमेह होतो.

स्वादुपिंडावरच्या आजारांमुळे होणारा मधुमेह : स्वादुपिंडावर सूज, खडे, कर्करोग, स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया यामुळे स्वादुपिंडाचे नुकसान झाल्याने इन्शुलिन अल्प प्रमाणात तयार होते व रक्तातील शर्करा वाढते व मधुमेह होतो.

नवजात मधुमेह : हा दुर्मीळ मधुमेह असून आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांत होतो.

औषधामुळे होणारा मधुमेह : स्टिरॉईडसारख्या औषधांनी (गोळ्या, मलम किंवा डोळ्याचे ड्राप्स, इनहेलर)

रक्तदाबाच्या काही औषधांनी

केमिकल्स, ‘एचआयव्ही’ची औषधे

संप्रेरकाच्या अभावाने किंवा वाढण्याने होणारे आजार

काही व्हायरसमुळे

मधुमेहाचा प्रकार जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्यानुसार तपासणी केल्याने योग्य व्यवस्थापन करू शकतो. परिणामी, आपले आयुष्य निरोगी ठेवण्यात मदत होईल. काही मधुमेहाच्या प्रकारचे निदान करण्यासाठी विशेष तपासण्या कराव्या लागू शकतात, ते तुमचे डॉक्टर ठरवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT