Nocturia Disease sakal
आरोग्य

Nocturia Disease : सावधान! रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पित आहात का? तुम्ही या आजारास पडू शकता बळी

Nocturia Disease आरोग्य तज्ज्ञांचे मते पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पण काहीवेळा आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

आताच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये बहुतांश जण झोपण्यापूर्वी खूप पाणी पितात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्रीच्या वेळेस पाणी पिण्याच्या या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. हेल्थ एक्सपर्टच्या मते, पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु काही वेळा जास्त पाणी प्यायल्याने देखील शारीरिक समस्या उद्भवू शकतात. 

विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ज्या लोकांना रात्री जास्त पाणी पिण्याची सवय असते, त्यांना 'नॉक्चुरिया' (Nocturia Disease) नावाचा आजार होऊ शकतो. या स्थितीत, संबंधित व्यक्तीला रात्री वारंवार लघवी होते आणि यामुळे झोपेवरही परिणाम होतात. परिणामी दुसऱ्या दिवशी शारीरिक थकवा जाणवतो.  

रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साचते. त्यामुळेच वारंवार लघवीची समस्या निर्माण होते. वारंवार लघवीला जाण्यामागे मधुमेह, मूत्रमार्गात संसर्ग इत्यादी अनेक कारणेही असू शकतात.

  • जास्त पाणी पिणे : रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला वारंवार लघवीला होऊ शकते.

  • मधुमेह : मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये अनेकदा नॉक्चुरिया आजाराची लक्षणे दिसू शकतात, कारण त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्यांना वारंवार लघवीला होते.

  • मूत्रमार्गातील संसर्ग : मूत्रमार्गातील संसर्गामुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते. यासह लघवीच्या जागेवर जळजळ व वेदना होणे या समस्याचांही सामना करावा लागू शकतो. 

जाणून घ्या या समस्येवरील उपाय 

  • झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा

  • जर आपण वारंवार लघवी होण्याच्या समस्येचा सामना करत असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT