Plastic Cup esakal
आरोग्य

Plastic Cup : प्लास्टिक कप ऐवजी कागदाच्या कपातून चहा पिताय? थांबा.. कागदाचा कप देखील आहे आरोग्यासाठी घातक

पेपर कप इतर सजीवांनाही हानी पोहोचवतात

सकाळ डिजिटल टीम

Plastic Cup : त्यामुळे बाहेर जात असाल आणि चहा-कॉफी पित असाल तर त्यासाठी स्वतःचा कप न्या आणि चहा-कॉफीचा आनंद घ्या .चहाच्या टपरीवर गेलं की बरेच जण चहा विक्रेत्याला सांगतात की, भाऊ, चहा ग्लासात किंवा प्लास्टिकच्या कपात देऊ नको. त्याऐवजी पेपर कप दे. पण मंडळी हे पेपर कप प्लास्टिकच्या कपांइतकेच आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. पेपर कप इतर सजीवांनाही हानी पोहोचवतात, असंही त्यात म्हटलंय.

पेपर कप आरोग्यासाठी घातक.. पण कसे?

प्लास्टिक कपामुळे प्रदूषण वाढतंय आणि तेच कमी करण्यासाठी अनेकांनी प्लास्टिकऐवजी कागदी कप वापरण्यास सुरुवात केली. चहा-कॉफी किंवा अगदी पाणी प्यायला देखील ते फक्त कागदी कप वापरू लागले.पण गटेनबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी यात एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी हे कप निसर्ग आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचा दावा केला आहे. एवढच नाही तर त्यामध्ये घातक रसायनेही असतात.

विद्यापीठाच्या जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान विभागातील पर्यावरण विज्ञानाचे प्राध्यापक बेथनी कार्नी सांगतात, आम्ही कागदाचे कप आणि प्लास्टिकचे कप काही आठवडे पाण्यात सोडले. यानंतर त्याचा डासांच्या अळ्यांवर काय परिणाम होतो हे पाहिले. या कपांमधील डासांच्या अळ्यांवर विपरीत परिणाम झाला.

पेपर कपवर प्लास्टिक वापरले जाते का?

सायन्स डेलीच्या रिपोर्टनुसार, पेपर फॅट रेसिस्टंट किंवा वॉटर रेझिस्टंट नसतो. त्यामुळे अन्न पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या कागदाच्या पृष्ठभागावर कोटिंग आवश्यक असते. हे प्लास्टिक कॉफी किंवा चहा हातावर पडण्यापासून रोखते. म्हणजे पेपर कपवरही प्लास्टिकचा थर लावला जातो.

आजकाल प्लास्टिक कपवर पॉलीलॅक्टाइड (पीएलए), बायोप्लास्टिकचा थर लावला जातो. बायोप्लास्टिक्स जीवाश्म इंधनापासून नव्हे तर नूतनीकरणीय संसाधनांपासून बनवले जातात. पीएलए हे बायोडिग्रेडेबल असायला हवे होते पण ते विषारी देखील असल्याचे अभ्यासात आढळून आले.

अन्न पॅकेजिंग मध्ये वापरले जाते

प्रोफेसर बेथनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण प्रदूषण या विषयावर त्यांचा संशोधन अभ्यास प्रकाशित केला आहे. ते म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर आम्हाला डिस्पोजेबल उत्पादने वापरण्यास शिकवले गेले. आता डिस्पोजेबल जीवनशैली बदलण्याची गरज आहे. त्यामुळे बाहेर जात असाल आणि चहा-कॉफी पित असाल तर त्यासाठी स्वतःचा कप न्या आणि चहा-कॉफीचा आनंद घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या समाजातून आणि निसर्गातून प्लास्टिकचे उच्चाटन करण्यासाठी युएन जगभरातील देशांसोबत काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT