Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : वारंवार तोंड कोरडं पडतंय? असू शकतात 'हे' गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

ही समस्या तुम्हाला दीर्घकाळ उद्भवत असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते

सकाळ ऑनलाईन टीम

Health Tips : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात घसा जास्त सुखतो. कारण हिवाळ्यात थंडीमुळे घामही कमी येतो आणि तहानही कमी लागते. त्यामुळे वारंवार घसा कोरडा पडतो. मात्र ही समस्या तुम्हाला दीर्घकाळ उद्भवत असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते.

जर वारंवार तोंड कोरडे पडत असेल आणि तहान लागत असेल तर यावेळी ही रक्तातील साखर वाढण्याची लक्षणे असू शकतात. अशा स्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण उच्च रक्तातील साखरेला हायपरग्लाइसेमिया देखील म्हणतात. (Health News)

लक्षणे

हाय ब्लडशुगरची समस्या झाल्यास तोंड कोरडे पडणे आणि वारंवार तहान लागणे.

  • शरीरातील शुगर लेव्हल वाढणे

  • सारखे लघवीला जाणे

जेव्हा डॉक्टर मधुमेहावर उपचार करतात तेव्हा रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे हाच त्यामागचा उद्देश असतो. पण अनेक वेळा रक्तातील साखरेचे प्रमाण सारखेच असते. अशावेळी हायपरग्लाइसेमिया योग्य त्यावेळी ओळखणे अधिक गरजेचे असते.

काहीवेळा उच्च रक्तातील साखर हा फारसा चिंतेचा विषय नसतो, परंतु जेव्हा यामुळे तुमच्या शरीरात समस्या निर्माण होतात तेव्हा ते आरोग्यासाठी धोकादायक असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अनेकांचे तोंड कोरडे पडते. त्यामुळे काही लोकांना वारंवार लघवीला जावे लागते. यासोबतच थकवा जाणवणे, वजन कमी, त्वचा संक्रमण, मूत्राशय संसर्ग असे अनेक आजार उदभवू शकतात. (Diabetes)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT