Health Care esakal
आरोग्य

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीराच्या उष्णतेतही वाढ होते. यामुळे पोटात आग होणे, मूळव्याध, ॲसिडिटी यांसारखे आजार जडतात.

सकाळ वृत्तसेवा

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीराच्या उष्णतेतही वाढ होते. यामुळे पोटात आग होणे, मूळव्याध, ॲसिडिटी यासारखे आजार जडतात. योग्य काळजी आणि आहार घेतल्यास यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उन्हाळ्यात ‘सन स्ट्रोक’चा धोका अधिक असतो. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. त्यामुळे पाणी कमी होऊन शरीरातील उष्णता वाढते. यासाठी जास्तीत-जास्त द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. गोड, थंड पदार्थांचे सेवन करावे. यासह शरीरातील इलेक्ट्रोराइटचे प्रमाण योग्य ठेवणे महत्त्वाचे ठरते. शरीरातील उष्णता वाढल्यास घरात असतानाही माणसाला धोका संभवतो. यामुळे योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

अशी घ्यावी काळजी

  • भरपूर पाणी पिऊन घराबाहेर पडावे.

  • बाहेर पडताना पांढऱ्या कपड्याने कान झाकावे.

  • लस्सी, ताक, लिंबू पाणी, पन्हे, कोकम शरबत घ्यावे.

  • इलेक्ट्रोराइट बॅलन्स साठी लोणचे,चटणी याचे सेवन वाढवावे.

  • वाळा, चंदन, नागरमोथा थंड पाण्यात भिजवून ते पाणी प्यावे.

  • जिरेपूड टाकूनदेखील ताकाचे सेवन करू शकतात.

तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे लावणे उत्तम पर्याय. तापमानवाढीचा परिणाम शरीराच्या उष्णतेवर होत असल्याने, आहारदेखील महत्त्वाचा ठरतो. पोटात आग होणे, मूळव्याध, ॲसिडिटी यासारखे आजार होतात. यासाठी द्रव आहाराचे सेवन वाढवावे. त्यात वेगवेगळे शरबत, पन्हे, ताक, लस्सी यांचा समावेश करू शकता.

- डॉ. मनोज जोशी, आयुर्वेदतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT