आरोग्य

Health News : शरीरात नेहमी थकवा राहतोय; जाणून घ्या, काय आहे कारण?

शरीरातील थकवा हा व्हिटॅमिन 'बी'च्या कमतरतेमुळे येतो.

सकाळ डिजिटल टीम

सकाळी उठल्यानंतर अनेकवेळा थकवा जाणवतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात नैराश्येने होते. त्यामुळे तुम्हाला ऑफिसलाही जायचा कंटाळ येतो. घरातील एखादे कामे करण्याची ईच्छा राहत नाही. दिवसभर फक्त झोपावे असे वाटते. मात्र असे का होते याचा विचार कधी केला आहे का? शरीरातील थकवा हा व्हिटॅमिन 'बी'च्या कमतरतेमुळे येतो. आपल्या शरीरातील ऊर्जा आणि काही करण्याचा उत्साह हळूहळू कमी होतो.

यासाठी आपल्या आहारात योग्य पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक असते. जेणेकरून आपल्याला अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला शरीरातील व्हिटॅमिन बी कसे वाढवावे हे सांगत आहोत. 'बी' जीवनसत्व भरून काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ शकता यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे...

या व्हिटॅमिन बी पदार्थांचा आहारात समावेश करा

  • व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे आकुंचन पावू लागतात. त्वचा निस्तेज होते आणि केसही गळू लागतात. ही सर्व लक्षणे व्हिटॅमिन 'बी' च्या कमतरतेमुळे उद्भवतात.

  • अशावेळी 20 ते 30 वयोगटातील लोकांनी आपली दिनचर्या सुधारली पाहिजे. अन्यथा लहान वयातच तुम्हाला आजारांचा सामना करावा लागेल.

  • आपल्या आहारात दही समाविष्ट करून, आपण जीवनसत्व B12, B2, 1 ची कमतरता पूर्ण करू शकता. यात फॅटचे प्रमाण कमी असते. आणि हे तुमच्या पोटासाठी आणि त्वचेसाठी उत्तम असते.

  • या जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीन, टीफू, सोया दूध यांचा समावेश करावा. हे घटक तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी पडतील.

  • तुमच्या नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन बीची कमतरता पूर्ण करू शकता. दररोज 2 अंडी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

  • ओट्स खाल्ल्याने शरीराला फायबर आणि जीवनसत्त्वे दोन्ही मिळतात. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी 12 जास्त असते. जे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर ब्रोकोलीचाही आहारात समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT