आरोग्य

Health Care News: चपाती ऐवजी या दोन पिठाच्या भाकरी खाणे आरोग्यदायक! हाडे होतील मजबूत

प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि योग्य असा आहार घेतला पाहिजे.

Aishwarya Musale

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पौष्टिक आहार खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही निरोगी असाल तेव्हाच तुम्ही प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करू शकाल. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि योग्य असा आहार घेतला पाहिजे. 

तुमचं आरोग्य उत्तम आणि रोगविरहीत असेल तरच निरोगी जीवन आनंदाने जगता येते. तुम्ही कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकता. यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. आपण रोजच्या आहारात चपातीचा समावेश करतो. मात्र याशिवाय अशी काही तृणधान्ये आहेत जी तुम्हाला निरोगी ठेवतात.

या काही निवडक तृणधान्यांसंदर्भात अगदी थोड्याफार लोकांना माहिती आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की चपातीशिवाय नाचणीच्या आणि बाजरीच्या पिठाची भाकरीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. या पीठाची भाकरी हाडांसाठी आरोग्यदायी असते. त्यामुळे या भाकरी खाल्ल्यानंतर शरीराला होणाऱ्या फायद्यांसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

  • बाजरी आणि नाचणीपासून बनवलेल्या भाकरीही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. जे शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात.

  • या दोन्ही पिठांच्या भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. वयोवृद्धांनी या पिठाची भाकरी जरूर खावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे सांधेदुखीलाही आराम मिळतो.

  • बाजरी आणि नाचणीची भाकरी दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे संधिवात रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. यासह पित्तामुळे होणारी जळजळही कमी होते.

  • बाजरीत कॅल्शियम आणि फॉस्फरस अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळे बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास होत असेल तर या दोन्ही पिठाच्या भाकरींचा आहारात लवकरात लवकर समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT