Garlic Benefits sakal
आरोग्य

Garlic Benefits : लसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा

आज आपण लसूणचे असेच फायदे जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो.

याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे. सर्दी, खोकला ताप या आजारांसाठी तर लसूण अधिक फायदेशीर ठरते. आज आपण लसूणचे असेच फायदे जाणून घेणार आहोत. (eat Garlic daily and reduce cholesterol level )

सर्दी खोकला

सर्दी खोकलासाठी लसूण हे खूप फायदेशीर आहे. लसणाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी असते.

कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब

कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या खूप वाढली आहे. या समस्यामुळे हार्ट अटॅकचाही धोका वाढतो पण जर तुम्ही लसूणचे सेवन केले तर कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लज प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

तणाव दूर होतो

लसूणच्या सेवनाने स्ट्रेस दूर होतो. तुम्ही जर स्ट्रेसफुल आयुष्य जगत असाल तर दररोज लसूण खावे.

थकवा दूर करणे

जर तुम्हाला सातत्याने थकवा जाणवत असेल तर तुम्ही लसणाचे सेवन करावे. यामुळे तुमचा थकवा दूर होऊ शकतो.

सांधेदुखीचा त्रास

ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल त्यांनी नेहमी लसूणचे सेवन करावे. रिकाम्या पोटी लसूण चावून खावे, यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

प्रजनन क्षमता वाढते

दररोज लसूण चावून खाल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते आणि यामुळे प्रजनन क्षमता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT