food
food sakal
आरोग्य

Health Tips: व्यायाम करण्यापूर्वी 'हे' पदार्थ खा, मिळेल झटपट एनर्जी

Aishwarya Musale

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. नियमित व्यायाम केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते. जे लोक जिममध्ये जातात किंवा वर्कआउट करतात, त्यांनीही त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. वर्कआउट करताना शरीराला जास्त एनर्जी लागते. यामुळेच लोक जिममध्ये जाण्यापूर्वी प्री-वर्कआउट पदार्थ घेतात. यामुळे शरीरातील स्टॅमिना आणि एनर्जी लेव्हल वाढते. तसेच, वर्कआउट्स दरम्यान परफॉर्मन्स वाढविण्यात मदत करते.

अनेकदा काही लोकांच्या मनात प्रश्न येतो की वर्कआउट करण्यापूर्वी काय खावे? डायटीशियनच्या मते, व्यायामापूर्वीच्या खाद्यपदार्थांमध्ये प्रथिने, कर्बोदके आणि चरबी यांचे योग्य संतुलन असले पाहिजे. यामुळे शरीराला झटपट एनर्जी मिळेल आणि थकवाही कमी होईल. आज आम्ही तुम्हाला असेच काही पदार्थ सांगत आहोत, जे खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळेल. वर्कआउटच्या ३० मिनिटे आधी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.

ओट्स

ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स भरपूर असतात, जे दीर्घकाळ एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी कार्बोहायड्रेट्सचे एनर्जीमध्ये रूपांतर करते. व्यायामापूर्वी तुम्ही एक वाटी ओट्स आणि दूध किंवा व्हेजिटेबल्स ओट्स घेऊ शकता.

केळी

केळी हा एनर्जीचा चांगला स्रोत आहे. यामध्ये फ्रक्टोज आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते. त्यात पोटॅशियम देखील असते, जे नसा आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. केळीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही १-२ केळी खाऊ शकता.

अंडी

तुम्ही अनेकदा जिममध्ये जाणाऱ्यांना वर्कआउट करण्यापूर्वी अंडी खाताना पाहिलं असेल. हे प्रथिने आणि अमीनो ऍसिडने समृद्ध आहे. ते शरीराला एनर्जी देतात आणि स्नायूंच्या वाढीस मदत करतात. व्यायाम करण्यापूर्वी अंडी खाल्ल्याने एनर्जी आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होईल. यासाठी वर्कआउटच्या ३० ते ४० मिनिटे आधी उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट खाऊ शकता.

सुका मेवा

सुक्या मेव्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, चरबी, फायबर आणि कार्ब्स यांसारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. ते त्वरित शरीराची उर्जा पातळी वाढवतात, जे चांगले व्यायाम करण्यास मदत करतात. वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही बदाम, काजू, पिस्ता आणि मनुका यांसारखे मिक्स्ड ड्राय फ्रुट्स खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT