Health Tips 
आरोग्य

Health Tips : आयर्न-कॅल्शिअम वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ स्त्रियांच्या आहारात असलेच पाहिजेत!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जीवनसत्त्वे आणि लोहाची कमतरता असते.

सकाळ डिजिटल टीम

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक तत्वांची गरज लक्षात घेऊन आपल्या आहाराचे नियोजन केले पाहीजे. विषेशत: महिलांनी आहाराकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जीवनसत्त्वे आणि लोहाची कमतरता असते. यामुळे महिलांचे शरीर निरोगी बनत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही एक मोठी समस्या बनली आहे. (womens health protein and vitamin sources)

सध्या राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जोत आहे. लोकांना संतुलित आहाराच्या गरजेबद्दल जागरुक करणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील 50 टक्क्यांहून अधिक महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. अॅनिमियामुळे तुम्हाला विविध प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. आहारातील लोहाची कमतरता यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे मानले जाते. यामूळेच आज जाणून घेऊयात जीवनसत्व आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.

आयर्न

शरीरासाठी आवश्यक आयर्न मिळेस अशा गोष्टींचा समावेश सर्व महिलांनी रोजच्या आहारात केला पाहिजे,असे आहारतज्ञांचे मत आहे. आयर्न आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पोषकतत्व आहे जे एनर्जी वाढवण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि स्नायूंची हालचाल टिकवून ठेवण्यास मदत करते. शरीरातील ऑक्सिजनचे संतुलन राखण्यासाठीही आयर्न आवश्यक आहे. मांस, मासे, पालक, दुग्धजन्य पदार्थ हे शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढवण्यास फायदेशीर आहेत.

व्हिटॅमिन बी -12

व्हिटॅमिन बी-12 सर्व महिलांसाठी आवश्यक आहे. मेंदूचे कार्य उत्तम राखण्यासाठी, ऊर्जा पातळी आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 मदत करते. रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये आणि मज्जासंस्था निरोगी राखण्यासाठी फायदेशीर ठरते. पालक, बीट, बटाटा, मशरूम, मांस, मासे इत्यादींपासून व्हिटॅमिन बी-12 भरपूर प्रमाणात मिळते.

प्रोटीन

स्नायू मजबूत होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते, असे मानले जाते. प्रोटीन हा शरीरासाठी एक महत्त्वाचा उर्जा स्त्रोत आहे. पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेतल्यास स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी दूध, दही, अंडी, सोयाबीन, शेंगदाणे, चिकन इत्यादींचे सेवन करता येते.

कॅल्शियम

कॅल्शियम हे महिलांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे पोषक तत्वांपैकी एक आहे. हाडे निरोगी ठेवण्यास आणि सांधेदुखीचा धोका कमी करण्यास कॅल्शियम मदत करते. महिलांमध्ये सांधेदुखीची समस्या अधिक दिसून येते. यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणेही आवश्यक आहे. कॅल्शियमसाठी दूध, दही,चीज, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT