Exercise and health Errors and their easy solutions sakal
आरोग्य

व्यायाम आणि आरोग्य

आपण आजच्या लेखामध्ये सर्वसाधारण चुका व त्यावरील सोपे उपाय किंवा तोडगे बघू या.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

नवीन वर्ष सुरू झाल्यावर व्यायामाचे बरेच संकल्प केले जातात; पण नंतर ते बारगळले जातात. सुरवातीला चालू केलेला जोशात असणारा व्यायाम नंतर नीरस आणि कंटाळवाणा वाटू लागतो. वर्ष संपायला अजूनही नव्वद दिवस आहेत. आपण आजच्या लेखामध्ये सर्वसाधारण चुका व त्यावरील सोपे उपाय किंवा तोडगे बघू या.

वॉर्मअप न करणे

व्यायामाच्या सुरुवातीला स्नायूंना तयार करणे गरजेचे असते. असे केल्याने रक्ताभिसरण वाढते व स्नायूंना योग्य रक्तपुरवठा होण्यास मदत होते. असे न केल्यास स्नायूंना सूज येते.

फोनचा वापर किंवा गप्पा

व्यायाम करताना फोनचा वापर केल्यास, गप्पा मारत राहिल्यास व्यायामावरील लक्ष उडून इजा होऊ शकते. योग्य व्यायामासाठी योग्य श्वसनाची गरज असते. त्यामुळे व्यायाम करताना लक्ष श्वसनावर केंद्रित करावे.

अपुरी झोप

अपुऱ्या झोपेमुळे स्नायूंची झीज भरून येत नाही. स्नायूंची झीज भरून येण्यासाठी योग्य झोप अत्यंत आवश्यक आहे.

पाण्याचा अभाव

एसीचा वापर, थंड वातावरण इ. कारणांमुळे पाणी अल्प प्यायलं जातं. डिहायड्रेशनमुळे स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात. स्नायूंची झीज भरून येऊ शकत नाही. पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे.

अपुरा आहार

फॅड डाएट्सचा वापर, आहारातून महत्त्वाची अन्नधान्यं वगळणं इत्यादींमुळे शरीराची झीज होते. स्नायूंची झीज भरून येत नाही व त्यामुळे इजा होऊ शकते. योग्य आहारामुळे व्यायामाचा फायदा होण्यास मदत होते.

एकाच व्यायामपद्धतीचा समावेश

बऱ्याच वेळेस धावणं, पळणं इत्यादी व्यायामांकडे जास्त कल दिला जातो. काही कारणांमुळे जर ते व्यायाम करता येत नसतील, तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामपद्धतींचा वापर करावा. त्यामुळे व्यायामात विविधता मिळते.

सातत्याचा अभाव

असं म्हटलं जातं, की कोणतीही गोष्ट किमान २१ दिवस केलीत, तर तिचं रूपांतर सवयीमध्ये होतं. त्यामुळे वेळ देऊन व्यायाम करण्याकडे भर द्यावा. छोटे छोटे टप्पे विभागून घ्यावेत व ते प्रयत्न करून मिळवावेत.

व्यायामानंतर स्ट्रेचिंग

बऱ्याच वेळेस व्यायामानंतर स्ट्रेचिंगचा अभाव असतो. त्यामुळे स्नायूंना सूज येते, त्यांची झीज भरून येत नाही. रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. म्हणून योग, स्ट्रेचिंगसारख्या व्यायाम पद्धतींचा रोजच्या जीवनशैलीत नक्की समावेश करावा.

व्यायामाचे कपडे

बऱ्याच वेळेस व्यायाम करताना सुटसुटीत कपडे न वापरल्यामुळे व्यायामात अडथळे येतात, घाम शोषला जात नाही. व्यायामासाठी सुटसुटीत, घाम शोषल्या जाणाऱ्या कपड्यांचा वापर करावा.

शरीराचे ऐकावे

शरीरामध्ये होणारे निराळे बदल कटाक्षाने विचारात घ्यावेत. अतिरिक्त घाम, रक्तदाब, चक्कर, वेदना इत्यादींकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी थांबून, आराम करून परत व्यायाम करण्यास सुरुवात करावी.

या काही चुका आपल्या व्यायामामध्ये अडथळे आणू शकतात. त्यामुळे छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. नियमितपणा, शिस्त, आणि शरीराकडे लक्ष देऊन व्यायामास सुरवात करावी आणि चांगल्या आरोग्यपूर्ण शैलीकडे वाटचाल करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT