Eye Care Tips  Sakal
आरोग्य

Eye Care Tips : तुम्हीही जोर देऊन डोळे चोळताय का? दृष्टीवर होतील दुष्परिणाम

डोळ्यांमध्ये काही गेल्यास आपणही डोळे वारंवार चोळता का? तर मग वेळीच व्हा सावध कारण यामुळे रेटिनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

Harshada Shirsekar

Eye Care Tips : डोळ्यांमध्ये धूळ-मातीचे कण गेल्यास काही जणांना जोर देऊन डोळे वारंवार रगडण्याची सवय असते.  कित्येकदा डोळे इतके लाल होतात की औषधोपचार करावे लागतात. डोळ्यांवर अतिरिक्त ताण आल्यास डोळे दुखणे किंवा डोळ्यांतून पाणी येण्याची समस्या उद्भवते. 

पण डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. कारण यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. घरातील किंवा ऑफिसमधील कामांमध्ये व्यस्त असल्याने काही जण डोळ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत.  

डोळ्यांमध्ये काही गेले असल्यास यामुळे इंफेक्शन होण्याचीही समस्या असते. यावर वेळेतच उपाय होणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. डोळे रगडून किंवा डोळ्यांवर पाणी मारून स्वतःच काही तरी उपचार करणं टाळावे. 

डॉक्टरांशी संपर्क कधी साधावा?  

डोळ्यांमध्ये एखादे केमिकल गेले असल्यास किंवा एखादी जखम झाली असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. अनेक प्रयत्न केल्यानंतरही डोळ्यांचे दुखणे थांबत नसल्यास याकडे दुर्लक्ष करू नये. कारण यामुळे डोळ्यांच्या कॉर्नियाचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे दृष्टीवर दुष्परिणाम होऊ शकतात.

या गोष्टी ठेवा लक्षात  

  • आपले हात नेहमी स्वच्छ ठेवा

  • अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नये.

  • डोळ्यांत काही कण गेल्यास पापण्या उघडण्याचा प्रयत्न करावा.

  • डोळ्यांच्या सल्ल्यानुसारच ड्रॉपरचा वापर करावा. 

  • स्वतःहून कोणतेही उपचार करू नये.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT