Eye Care Tips
Eye Care Tips esakal
आरोग्य

Eye Care Tips : सकाळी उठल्या उठल्या डोळ्याभोवती घाण तयार होते? या टिप्स करा फॉलो...

Lina Joshi

Eye Care Tips : सकाळी झोपेतून उठल्यावर एक समस्या सतत जाणवते अन् ती म्हणजे डोळ्यात अडकलेली घाण, ही घाण डोळ्यांच्या काठावर आणि पापणीवर जमा होते. आपल्याला सवय असते की उठल्यावर आपण तोंड धुतो ते धुतांना डोळ्यातली घाण सुद्धा आपण धुवंत असतो. पण अनेकदा असं होतं की डोळे स्वच्छ करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.

डोळे नीट न धुता सगळ्यांच्या समोर जायचे म्हटले तरी कसं तरी होतं शियावी त्यामुळे आपले डोळेही नीट उघडत नाहीत. डोळ्यांच्या बाजूने चिकट पदार्थ जमा होणे, ज्याला सामान्य भाषेत चिपड, स्लीपी क्रस्ट असे देखील म्हणतात, हे खूप कॉमन आहे ही साधारणपणे चांगल्या आणि पूर्ण रात्रीच्या झोपेचे लक्षण असते, पण काहीवेळा हेच चांगले लक्षण त्रास देखील दर्शवू शकते. रात्रीच्या वेळीच डोळ्यात चिपड येण्याची कारण आहेत. त्याशिवाय या घाणेचा रंगही डोळ्यांची समस्या दर्शवतो. चला याबद्दल सविस्तर ऐकुया...

कसा तयार होतो चिपड?

जसे त्याच्या नावावरुन स्पष्ट होते हे चिपड किंवा घाण ही अनेक प्रकारच्या कचऱ्याचे मिश्रण आहे. हे डोळ्यातला कचरा, खवलेयुक्त त्वचेच्या पेशी, त्वचेचे तेल आणि झोपेच्या वेळी डोळ्यांद्वारे तयार होणारे अश्रू यांचे मिश्रण आहे. ही एक सामान्य आणि उत्स्फूर्त प्रक्रिया आहे, जी तुमचे डोळे निरोगी आणि योग्यरित्या काम करत असल्याचे दर्शवते.

फक्त रात्रीच का होतात?

पापण्या बंद असतात याव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळी हा चिपड साचण्याचे आणखी एक कारण आहे. दिवसभर वारंवार डोळे मिचकावताना, डोळ्यांतून नैसर्गिकरीत्या बाहेर पडणारे अश्रू, हा चिपड धुवून टाकतात आणि डोळ्यांत चिकटू देत नाहीत. रात्रीच्या वेळी पापण्या न मिचकावल्यामुळे आणि गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा डोळ्यांच्या कोपऱ्यात जमा होतो. काही लोकांमध्ये त्याचे प्रमाण जास्त तर काहींमध्ये कमी असू शकते.

बदललेला रंग समस्या दर्शवू शकतो:

साधारणपणे, डोळ्यांमधून बाहेर पडणाऱ्या या चिपडचा रंग पांढरा किंवा हलका क्रीम असा काहीसा असतो. पण जर हा रंग पिवळा किंवा हिरवा असेल तर ते डोळ्यातल्या बॅक्टेरियाचे लक्षण असू शकते. याशिवाय डोळ्यांना सूज येणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांवर मुरुम येणे, अश्रू वाहिनीला अडथळा येणे हे देखील याचे कारण असू शकते. काही प्रकरणांमध्ये, यामुळे पापण्या सकाळी उठल्यावर एकमेकांना चिकटून जातात, ज्यामुळे समस्या आणखीन वाढू शकते.

डोळ्यांची अशी काळजी घ्या:

सकाळी उठल्यानंतर चेहरा आणि डोळे नीट धुवा.

तुम्हाला कोणतीही ऍलर्जी किंवा इतर समस्याने पापण्या एकमेकांना चिकटतात अशात स्वच्छ सूती कापडाने किंवा कोमट पाण्यात भिजवलेल्या सुती कापडाने डोळ्यांवर फिरवत हलक्या हाताने चिपड काढा.

या चुका चुकूनही करु नका

चिपड झाल्याने वेदना आणि अस्वस्थता होत असेल किंवा दररोज सकाळी उठल्यावर तुमच्या पापण्या एकमेकांवर चिकटल्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला संसर्ग न पसरवता तुमचे डोळे स्वच्छ करण्यासाठी औषधे देतील.

डॉक्टरांच्या सल्ल्याने चांगले आय ड्रॉप वापरा. त्यामुळे डोळ्यांमध्ये ओलावा राहून ते स्वच्छही राहतात.

डोळे किंवा पापण्यांमध्ये खाज सुटणे, सूज येणे, लालसरपणा, जळजळ, अंधुक दृष्टी या समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

रात्री झोपण्यापूर्वी डोळे हातांनी स्वच्छ धुवा. यासाठी साधे पाणी वापरणे देखील एक चांगला पर्याय असेल.

कधीही मेकअप लावून झोपू नका. डोळ्यांचा मेकअप काढताना डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला लोशन, बेबी ऑइल किंवा बदामाच्या तेलाने हलक्या हातांनी मसाज करा.

नेहमी कॉन्टॅक्ट लेन्स बंद ठेवून झोपा. त्यांनाही स्वच्छ ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT