Facts About Tea  esakal
आरोग्य

Facts About Tea : उरलेला चहा परत गरम करून पिणे किती योग्य? वाचा सविस्तर

पण उरलेला चहा पुन्हा गरम करणे योग्य आहे का?

साक्षी राऊत

Facts About Tea : बहुतेकांची सकाळ चहाने सुरू होते. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. काही लोकांना दिवसातून दोन-तीन वेळा चहा लागतो. काही संशोधनात जास्त चहा पिण्याचे तोटेदेखील सांगण्यात आले आहे परंतु लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात. कधी कधी लोक खूप चहा बनवतात आणि नंतर वाटेल तेव्हा पुन्हा गरम करून पितात. पण उरलेला चहा पुन्हा गरम करणे योग्य आहे का?

थंड चहा विष बनू शकतो?

TOI च्या वृत्तानुसार, चहा बनवल्यानंतर काही मिनिटांनंतर तो थंड झाला म्हणून परत गरम केल्यास कुठलेही नुकसान नाही. मात्र तज्ञांच्या मते, चहा नेहमी फ्रेश पिणे कधीही चांगले होईल. कधी कधी चहा खूप लवकर थंड झाला तर गरम करा पण त्याची सवय करू नका. चहा पुन्हा गरम केल्याने चहामधील चव, सुगंध आणि पोषक तत्वे नष्ट होतात.

तज्ज्ञांच्या मते, चहा तयार होऊन चार तास झाले असतील, तर तो परत गरम करून पिण्याची चूक अजिबात करू नका. कारण तोपर्यंत अनेक बॅक्टेरिया त्यात वाढतात. जर तुम्ही दुधाचा चहा बनवला असेल तर त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. भारतातील बहुतेक लोक दुधाचा चहा पितात, त्यामुळे दुधाचा चहा पुन्हा गरम करण्याची चूक करू नका.

दूध आणि साखरेचा चहा

अनेकदा आपण चहा बनवताना त्यात दुधासोबत साखर घालतो. साखर अधिक बॅक्टेरियांना आमंत्रण देते. जेव्हा तुम्ही दूध आणि साखर घालून चहा बनवता तेव्हा तो थंड झाल्यावर लवकर खराब होतो. उन्हाळ्यात, जेव्हा तापमान खूप जास्त असते, तेव्हा चहा थंड झाल्यावर लगेच खराब होतो. थंड चहा पुन्हा गरम करून प्यायल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम उद्भवू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन थंड चहा गरम केल्यानंतर न पिणेच चांगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT