mithayia  sakal
आरोग्य

Festival Season : सावधान...! मिठाई घेता की आजार? अशी ओळखा दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ

दुधातील भेसळ ओळखण्यासाठी थोडे दूध उकळून त्यात दोन थेंब आयोडीन टाकायचे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर - सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मिठाईला मोठी मागणी आहे. मात्र, या काळात मिठाईमध्ये भेसळ होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी खात्री करूनच मिठाई खरेदी करणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने प्रशासनही दक्ष झाले असून, दूध, दुग्धजन्य पदार्थ बनविणारे व विक्री करणाऱ्यांकडील मालाच्या दर्जाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागास दिले.

दूध

दूध अधिक दाट असेल तर त्यात साय अधिक येते. त्यामुळे हे दूध चांगले आहे असा समज असतो. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी थोडे दूध उकळून त्यात दोन थेंब आयोडीन टाकायचे. (आयोडीनयुक्त मिठाचाही वापर करता येतो.) स्टार्चची भेसळ केलेल्या दुधाचा

रंग आयोडीन टाकल्यानंतर निळसर होतो. शुद्ध दुधाचा रंग बदलत नाही.

तेल

एका पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल घेऊन फ्रिजमध्ये तीस मिनिटे ठेवा. शुद्ध खोबरेल तेल घट्ट होते. अशुद्ध असेल तर पाण्यावर तेलाचा तरंग वेगळा दिसेल. तेलामध्ये ट्रायऑर्थोक्रिस्ट फॉस्फेट हा घातक घटक आहे का, याची चाचपणी करण्यासाठी दोन मिली तेलात थोडेसे तूप एकत्र करा. तेलाचा रंग बदलला, तर भेसळ आहे असे समजावे.

चांदीचा वर्ख

चांदी महाग असते, अशावेळी स्वस्तात मस्त पर्याय म्हणून मिठाईसाठी वर्खासाठी ॲल्युमिनियम आणि इतर धातूपासून बनलेला वर्ख वापरतात. अॅल्युमिनियमचा वर्ख १० पानांना ४० ते ६० रुपयांना मिळतो तर चांदीचा वर्ख १० पानांना ६०० ते ८०० रुपयांना मिळतो. त्यामुळे काही व्यापारी चांदीचा वर्ख वापरण्याचे टाळतात. वर्ख दोन बोटांच्या चिमटीत घेऊन चोळावा. चांदीचा वर्ख असल्यास तो सुटा होऊन बोटांना चिकटतो तर भेसळयुक्त वर्खाचा बारीकसा गोळा तयार होतो. शुद्ध चांदीचा व सोन्याचा वर्ख खडबडीत लागतो तर अॅल्युमिनियमचा वर्ख गुळगुळीत लागतो.

तूप

अनेकदा तुपामध्ये पिवळा रंग येण्यासाठी बटाटे कुसकरून घातले जातात. अर्धा चमचा तुपामध्ये दोन ते तीन थेंब आयोडीन टाकावे. त्याचा रंग बदलला, तर तुपामध्ये बटाट्यांची भेसळ आहे, असे समजावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT