Fitness Funda esakal
आरोग्य

Fitness Funda : हेल्दी असणं तुमच्या BMI वर अवलंबून नाही, ही पद्धत चुकीची; तज्ज्ञ सांगतात...

आरोग्याचं मोजमाप करण्यासाठी BMI मोजणे सगळ्यात चुकीचा मार्ग असल्याचं तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

For Health Only Measuring BMI Is Wrong : अनेक लोक आपले BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स वरून ठरवतात की, आपण फीट आहोत की, नाही. पण खरंतर हे तुमच्या आरोग्याविषयी ठरवण्याचे पॅरेमीटर्स असू शकत नाहीत असं तज्ज्ञ म्हणतात. जाणून घेऊया.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर्सला सल्ला दिला आहे की, शरीराचे आरोग्य तपासण्यााठी BMI चा उपयोग होऊ ने. अमेरिकेच्या डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेचं म्हणणं आहे की, BMI मुळे वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या लोकांच्या शरीरासंदर्भात निदान करण्यासाठी हे पुरेसे नाही. त्यामुळे यासंदर्भान नवीन प्रणाली लागू करण्यासाठी डॉक्टरांनी वोटिंगही केले आहे.

वॉशिंगटन यूनिव्हर्सिटीमध्ये मेडिसीनचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. स्कॉट हेगन म्हणतात BMI फॉर्म्युला तिथल्या गोऱ्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आला होता. नवीन प्रणाली यापासून दूर जाण्यासाठी पहिले पाऊल ठरेल. नवीन प्रणालीमध्ये व्यक्तीच्या उंचीनुसार वजनावर अधिक फोकस करण्यास सांगण्यात आले आहे.

Fitness Funda

याशिवाय, व्हिसेरल फॅट (आतड्यांभोवती आणि अवयवांभोवती साठलेली चरबी), बॉडी अॅडिपोसिटी इंडेक्स (हिप घेर), शरीरातील चरबीची टक्केवारी, हाडे आणि स्नायूंचे वस्तुमान, तसेच रक्तातील साखर आणि थायरॉईड यांसारखे अनुवांशिक आणि चयापचय घटक यावर चाचणी फोकसिंग सुचवण्यात आले आहे.

BMI कोणताही जादूचा नंबर नाही

डॉ. हेगन म्हणतात BMI आरोग्य तपासणीची फार चुकीची पद्धत आहे. जास्त BMI असणारा व्यक्तीही हेल्दी असू शकतो. कॅलिफोर्निया यूनिव्हर्सीटीचे मानसशास्त्राच्या प्राध्यापिका जेनेट तोमियामा म्हणतात, बीएमआय कोणताही जादूचा नंबर नाही, की जो तुमचं आरोग्य ठरवेल. जगभरात बीएमआयच्या आधारावर विविध गटांचा अभ्यास करणारे टेक्सास यूनिव्हर्सिटीचे रिसर्च असिस्टंट लिया गुटिन म्हणतात नवीन प्रणाली स्वस्त आणि अधिक चांगली परिणामकारक असेल.

Fitness Funda

नव्या प्रणालीचे परिणाम अधिक चांगले असतील

ओहियो स्टेट यूनिव्हर्सिटीच्या वेक्सनर सेंटरमध्ये डायबेटीस अँड मेटाबोलीझम रिसर्च सेंटरच्या संचालिका विला सुएह म्हणतात की, बाएमआय मुळे ट्रायग्लिसराइड्स म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचा कमी स्तर, प्री डायबेटीस आणि लिव्हर फॅट सारख्या गोष्टींचा विचार होत नाही. यामुळे अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. नव्या प्रणालीत जास्त चांगले परिणाम दिसतील आणि डॉक्टर्सना निदान करण्यास सोपे होईल.

Fitness Funda

बीएमआय नॉर्मल असला तरीही हृदयरोग, बीपी आणि डायबेटीसचा धोका

बऱ्याच काळापासून टाइप २ डायबेटीससाठी २५ किंवा त्याहून जास्त बीएमआयवाल्या लोकांना धोका असतो. पण अलिकडचे निरीक्षण सांगते की, आशियाई लोकांमध्ये साधारण २० बीएमआय (नॉर्मल) असूनही धोका समान आहे. असे मानले जाते की व्हिसेरल फॅट हानिकारक रसायने सोडते, ज्यामुळे आतड्यांभोवतीच्या ऊतींमध्ये जळजळ होते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात.

त्यामुळे हृदयविकार, बीपी, मधुमेहाचा धोका वाढतो. साधारणपणे, महिलांसाठी 35 इंच आणि पुरुषांसाठी 40 इंचांपेक्षा जास्त कंबरेचा आकार व्हिसेरल फॅटचे लक्षण आहे. परंतु हा बेंचमार्क आशियाई महिलांसाठी 31.5 इंच आणि पुरुषांसाठी 35.5 इंच राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT