- शुभांगी अत्रे, अभिनेत्री
आरोग्यदायी जीवनशैली राखणे हे माझ्या दैनंदिन नित्यक्रमाचा आवश्यक भाग आहे. मी सध्या ‘ॲण्ड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री असल्याने मला माझ्या व्यवसायासह माझ्या सर्वांगीण आरोग्यासाठी तंदुरूस्त राहणे खूप गरजेचे आहे. फिटनेससाठी मी नियमितपणे व्यायाम करते. आरोग्यदायी आहाराचे सेवन करते; तसेच मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करते. मी योगासने करून दिवसाची सुरूवात करते.
त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यास आणि मन एकाग्र होण्यास; त्याचबरोबर शारीरिक ताकद वाढवण्यासही मदत होते. मी विशेषतः आव्हानात्मक असलेला अष्टांग योगाचा आनंद घेते, जो माझे शरीर चपळ व मन शांत ठेवतो. योगानंतर मी इतर नियमित व्यायाम करते. व्यायामामुळे माझ्या स्नायूंना बळकटी मिळते आणि कंटाळा येत नाही. मी नियमितपणे कार्डियो व्यायाम, स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग करते.
रनिंग किंवा सायकलिंगसारख्या कार्डियो व्यायामामुळे हार्ट रेट वाढतात आणि स्टॅमिनाही वाढतो. स्ट्रेन्थ ट्रेनिंगदरम्यान वजन उचलण्याने स्नायूबळ वाढते आणि शरीरयष्टी उत्तम राहते. एचआयआयटी वर्कआऊट्समुळे कॅलरी कमी होण्यास आणि सहनशक्ती वाढण्यास मदत होते.
माझ्या फिटनेसमध्ये सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. माझ्या संतुलित आहारामध्ये फळे, भाज्या, प्रोटिन्स व संपूर्ण धान्यांचा समावेश असतो. हायड्रेशन महत्त्वाचे आहे, म्हणून मी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी पिते. प्रक्रिया केलेले व गोड पदार्थ सेवन करणे टाळते. त्याऐवजी नैसर्गिक व पौष्टिक घटकांवर लक्ष केंद्रित करते.
मी स्थिर ऊर्जा मिळण्यासाठी आहाराचे काळजीपूर्ण नियोजन केले आहे; तसेच मी आरोग्यदायी आहाराचे सेवन करते. भूक लागताच अनारोग्यकारक स्नॅकऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करते. आराम व रिकव्हरीही तितकेच महत्त्वाचे आहेत. मी पुरेशा प्रमाणात झोप घेते, जी स्नायू रिकव्हरी व मनःशांतीसाठी आवश्यक आहे. मी मानसिक शांततेसाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करते.
फिटनेससाठी सर्वांगीण दृष्टिकोन; तसेच शारीरिक व्यायाम, संतुलित आहार, पुरेशा प्रमाणात आराम व मानसिक स्वास्थ्य मला उत्साहित राहण्यास आणि माझ्या आव्हानात्मक करिअरमधील आव्हानांचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहण्यास मदत करतात. सकारात्मक राहणे व सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. मी योग्य उद्दिष्टे आखते आणि माझ्या प्रगतीवर देखरेख ठेवते. तसेच लहान-लहान यशपूर्ती साजऱ्या करते.
अवघड योगासनांवर प्रभुत्व मिळवायचे असो किंवा वर्कआऊट वाढवायचे असो, या गोष्टी मला प्रेरणा देतात. फिटनेस माझ्या आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग आहे, ज्यामुळे मी वैयक्तिकदृष्ट्या व व्यावसायिकदृष्ट्या सर्वोत्तम जीवन जगण्यास सक्षम होते. शिस्तबद्धता, समर्पितता आणि सकारात्मक मानसिकतेसह मी इतरांनाही फिटनेस राखण्यास प्रोत्साहन देते.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.