Fitness Tips  esakal
आरोग्य

Fitness Tips : मॉर्निंग वॉक करण्याची योग्य पद्धत कोणती? काय करावे अन् करू नये, जाणून घ्या

Fitness Tips : सकाळी मॉर्निंग वॉकला जायला अनेकांना आवडते. परंतु, मॉर्निंग वॉक करण्याचा योग्य मार्ग कोणता?

Monika Lonkar –Kumbhar

Fitness Tips : सकाळी मॉर्निंग वॉकला जायला अनेकांना आवडते. परंतु, मॉर्निंग वॉक करण्याचा योग्य मार्ग कोणता? हे कदाचित अनेकांना माहित नसेल. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने मॉर्निंग वॉक केला तर तुम्ही आजारी पडू शकता.

मॉर्निंग वॉक अर्थात सकाळी चालायला जाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. चालण्यामुळे, आरोग्याला अनेक महत्वपूर्ण फायदे होतात. शरीरातील स्नायू मजबूत होतात, हाडे निरोगी राहतात आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

परंतु, जर तुम्ही योग्य प्रकारे मॉर्निंग वॉक नाही केला, तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उदा. जसे की, काही लोकांची सकाळी फिरायला जाण्यापूर्वी पुरेशी झोप होत नाही. अशा स्थितीमध्ये मग थकवा आणि चिडचिड जाणवते. त्यामुळे, मॉर्निंग वॉक योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. त्यासंदर्भातील काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाणी अवश्य प्या

मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही थोडे पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात योग्य हायड्रेशन ठेवण्यासाठी तुम्ही पाणी अवश्य प्यायला हवे. शिवाय, सकाळी चालण्याआधी पाणी प्यायल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि शरीर अधिक चांगल्या प्रकारे सक्रिय राहते. त्यामुळे, मॉर्निंग वॉकला बाहेर पडण्यापूर्वी पाणी अवश्य प्या. (Be sure to drink water)

हलका आहार महत्वाचा

सकाळी चालायला बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही हेव्ही खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण, यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, सकाळी हलका आणि पौष्टिक आहार घ्या. जसे की, फळे, दही, शेवया इत्यादी खाणे चांगले. यामुळे, तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळते आणि तुम्ही फिरायला जायला तयार होता. (A light diet is important)

योग्य फूटवेअरची निवड

सकाळी चालायला जाताना योग्य फूटवेअरची निवड करणे, हे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही आरामदायक आणि योग्य फिटिंगचे वॉकिंग शूज निवडा. तुमचे शूज आरामदायक आणि तुमच्या पायांसाठी ते व्यवस्थित आहेत ना? याची एकदा अवश्य खात्री करा. तुमच्या पायांच्या आकारानुसार, योग्य आकाराच्या शूजची निवड करा. जेणेकरून चालताना तुमच्या पायांना कोणतीही अडचण येणार नाही. (Choosing the right footwear)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT