Health Care Tips Sakal
आरोग्य

Health Care Tips रात्री या तीन पावडरचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

निरोगी आरोग्य जगायचे असेल तर आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Harshada Shirsekar

Health Care News : आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या कित्येक गोष्टींपासून आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. अनेकांना याबाबत माहिती असूनही ही मंडळी जंक फूड, फास्ट फूड अशा आरोग्यास घातक असणाऱ्या पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करतात. पण मित्रांनो वेळीच सावध व्हा अन्यथा आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांपासून सुटका हवी असल्यास तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या अळशी, सूंठ आणि दालचीनीचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करून पाहा. या तीन गोष्टींचे योग्य प्रमाणात व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सेवन केल्यास आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतात. कारण या तिन्ही गोष्टींमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे.

महत्त्वाचे म्हणजे अळशी, सूंठ आणि दालचीनीचे आपण रात्री झोपण्यापूर्वी सेवन केल्यास आरोग्यास लाभदायक ठरू शकते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

बद्धकोष्ठतेची समस्या होते दूर

आपण देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त आहात तर रात्री झोपण्यापूर्वी अळशी, सूंठ आणि दालचीनीच्या पावडरचे एकत्रित सेवन करा. योग्य प्रमाणात या मिश्रणाचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

सांधेदुखीची समस्या होते कमी

हाडांचे दुखणे, सांधेदुखीच्या समस्येतून सुटका हवी असल्यास आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या तिन्ही पावडरचे मिश्रण तयार करून त्याचे सेवन करा. कारण यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे साध्यांचे दुखणे आणि सूज इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

सर्दी-खोकल्याची समस्या होते दूर

सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अळशी, सूंठ आणि दालचीनीच्या पावडरचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. कारण यामध्ये सर्दी-खोकल्याची समस्या कमी करण्यास उपयुक्त असणारे औषधी गुणधर्म आहेत.  

वेटलॉससाठी लाभदायक

आपण देखील वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घेत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी अळशी, सूंठ आणि दालचीनीच्या पावडरचे सेवन करावे. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT