Diabetes Symptoms sakal
आरोग्य

Diabetes Symptoms: 'या' एका लक्षणावरुन ओळखा तुम्हाला डायबेटिस आहे की नाही!

हे लक्षण दिसलं तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वैष्णवी कारंजकर

Diabetes Symptoms: रक्तात साखरेचं प्रमाण जास्त झाल्याने होणारा आजार म्हणजे डायबेटिस. इन्सुलिन हा एक असा हार्मोन आहे, जे जेवणापासून ग्लुकोज वेगळं करतो आणि कोशिकांना उर्जा देण्यास मदत करतो.

पण जेव्हा शरीर गरजेइतकं इन्सुलिन बनवू शकत नाही, किंवा इन्सुलिनचा योग्य उपयोग करू शकत नाही, तेव्हा रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं.

डायबेटिसमुळे हृदयविकार, स्ट्रोक, किडनीच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. नुकतंच डायबेटिससंदर्भात अभ्यास करणाऱ्या diabetes.co.uk या वेबसाईटने एक अभ्यास प्रसिद्ध केला. यानुसार, डायबेटिस असलेल्या लोकांच्या संदर्भात एक लक्षण आढळून आलं आहे. हे लक्षण दिसलं तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

या अभ्यासानुसार, ज्या लोकांना वारंवार लघवीला जावं लागतं, त्यांना टाईप १, टाईप २ डायबेटिसचा धोका असू शकतो.

जे लोक वारंवार लघवीला जातात, किंवा ज्यांना दिवसात तीन लीटरपेक्षा अधिक लघवी होते, त्यांना डायबेटिसचा धोका अधिक असतो. वारंवार लघवीला जावं लागल्याने डिहायड्रेशन होतं. त्यामुळे जर यावर उपचार झाले नाहीत तर किडनी संदर्भातल्या आजारांचा धोकाही संभवतो.

डायबेटिस असताना रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे किडनी सगळ्या साखरेवर प्रक्रिया करू शकत नाही आणि त्यामुळे रक्तातलं अतिरिक्त ग्लुकोज युरिनच्या माध्यमातून निघून जातं. पाणी जास्त शोषून घेतलं जातं. म्हणजे शरीरात मोठ्या प्रमाणावर युरिन तयार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT