Health Tips sakal
आरोग्य

Health Tips: वेट लॉसपासून ते उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यापर्यंत उपयुक्त ठरतो गूळ, रात्री खाण्याचे फायदे

अनेकांना हे माहीत नसते की रोज गुळ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

Aishwarya Musale

गुळ हा अनेकदा साखरेला आरोग्यदायी पर्याय मानला जातो. हे रिफायनिंग न करता बनवलेले असल्याने त्यात साखरेपेक्षा जास्त पोषक असतात. नैसर्गिकरित्या गोड असल्याने गुळात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

शतकानुशतके भारतात गुळाचा वापर स्वयंपाक आणि घरगुती उपचारांमध्ये केला जात आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा.

गूळ हा लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. हिवाळ्यात अनेकदा गूळ खाल्ला जातो, पण अनेकांना हे माहीत नसते की रोज गुळ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया रोज गूळ का खावा.

पचन समस्या

पचनाच्या समस्यांमुळे अनेकदा लोकांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन आणि पोट फुगणे असा त्रास होऊ शकतो. पण आम्ही तुम्हाला सांगतो की गूळ खाल्ल्याने या सर्व समस्यांवर मात करता येते. म्हणूनच जेवल्यानंतर गुळाचे छोटे तुकडे खावेत.

घसादुखीवर फायदेशीर

घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी गूळ हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्हाला फक्त तुळशीची पाने बारीक करून त्यांचा रस काढायचा आहे आणि त्यात गूळ घालायचा आहे. एक चमचा हे मिश्रण दिवसातून तीन वेळा सेवन केल्याने घसादुखीमध्ये लवकर आराम मिळतो.

पिरियड्समध्ये आराम

मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि क्रॅम्प्सपासून आराम देण्यासाठी गूळ खूप प्रभावी आहे. सोपे घरगुती उपाय फॉलो करण्यासाठी, थोडे दूध गरम करा आणि त्यात गूळ घाला. मासिक पाळी दरम्यान दिवसातून दोनदा पूर्ण कप दूध पिणे खूप फायदेशीर आहे.

फ्लू

सर्दीमध्येही गूळ खूप फायदेशीर मानला जातो. एक कप गरम पाण्यात गुळ टाका आणि तो स्वतःच विरघळू द्या. यानंतर त्यात थोडे आले टाकून उकळावे. ते थंड होऊ द्या आणि नंतर ते साठवा. सर्दीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी हे दिवसातून 3-4 वेळा प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT