थोडक्यात:
बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूलता वाढते आहे, पण जॉर्जिना बेलीने त्यावर मात केली.
तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा आधार होता हाय प्रोटीन डाएट आणि नियमित व्यायाम.
18 महिन्यांत 45 किलो वजन कमी करून ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
How Georgina Lost 45kg With Just Two Habit Changes: आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निरोगी आरोग्य मिळवणे खूप कठीण झाले आहे. राहणीमानातील बदल, जेवणाच्या अयोग्य वेळा, अनियमित झोप, अनुवंशिकता यामुळे अनेकजणांना लठ्ठपणा किंवा स्थूलतेला सामोरे जावे लागते.
मात्र याचसोबत, सध्या अनेकजण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करून आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसतात. अशीच एक इंग्लंड येथील जॉर्जिना बेली हिने तब्बल 45 किलो वजन कमी केले असून तिचा हा संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास अवघ्या 18 महिन्यांत घडून आला आहे.
यामुळे ती सगळ्यांसाठी प्रेरणा बनली आहे. या वजन कमी करण्याच्या प्रवासात तिला दोन गोष्टींचा भरपूर फायदा झाल्याचे तिने सांगितले आहे. काय आहेत या दोन गोष्टी आणि कोणत्या कारणामुळे तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला ते जाणून घेऊया.
जॉर्जिना बेली एका जत्रेला (फेस्टिवल)ला गेली असताना तिच्या स्थूलतेमुळे तिला जत्रेतील झोपाळ्यावर इतरांपासून वेगळे बसावे लागले. ही घटना तिला मनात खोलवर लागली आणि त्याच क्षणी तिने स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेतला.
एवढेच नाही तर रोजच्या कामात देखील तिला त्रास होत असल्यामुळे तिला तिच्या आरोग्याची काळजी वाटू लागली. केवळ सुंदर दिसण्यासाठी नाही, तर उत्तम आयुष्य जगण्यासाठी आणि स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी जॉर्जिनाने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.
जॉर्जिना बेलीने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची माहिती स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केली असून, यामध्ये तिने कोणते उपाय अवलंबले हे सविस्तर सांगितले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, वजन घटवण्यासाठी तिने मुख्यतः दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले:
हाय प्रोटीन डाएट
नियमित व्यायाम
जॉर्जिना बेलीने वजन कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत मोठे बदल केले. तिने आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवले आणि नॉनव्हेज अन्नावर जास्त भर दिला. तसेच दररोज वेट ट्रेनिंग आणि कार्डिओसारखे व्यायाम प्रकार नियमितपणे केले.
शरीर हायड्रेट राहावे म्हणून ती रोज किमान 4 लिटर पाणी प्यायची आणि फायबरचे सेवनही योग्य प्रमाणात करत होती. वजन कमी करत असताना भूक आणि चव साधण्यासाठी तिने दर 15 दिवसांनी एक चीट मील घेतले, जेणेकरून ती आपल्या आहारावर नियंत्रण ठेवू शकेल.
या सगळ्या बदलांमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तिने 18 महिन्यांत तब्बल 45 किलो वजन कमी केलं. आज तिचा हा प्रवास अनेकांना आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी प्रेरणा देतो.
जॉर्जिना बेलीने वजन कमी करण्याचा निर्णय का घेतला? (Why did Georgina Bailey decide to lose weight?)
एका जत्रेत झोपाळ्यावर एकटी बसावे लागल्याने तिला वाईट वाटले आणि आरोग्यावर लक्ष द्यावेसे वाटले.
तिने वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय केले? (What steps did she take to lose weight?)
तिने हाय प्रोटीन डाएट आणि नियमित वेट ट्रेनिंग व कार्डिओ यांचा समावेश केला.
तिने आहारात कोणते बदल केले? (What dietary changes did she make?)
तिने प्रोटीनचे प्रमाण वाढवले, नॉनव्हेजचा समावेश केला आणि फायबरचे योग्य प्रमाण ठेवले.
तिच्या प्रवासात कोणत्या सवयी महत्त्वाच्या ठरल्या? (Which habits helped her most during her journey?)
दररोज 4 लिटर पाणी पिणे, दर 15 दिवसांनी एक चीट मील घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.