Grahan in Pitru Paksha 2024: Sakal
आरोग्य

Chandra Grahan 2024: चंद्रग्रहण पितृपक्षात आल्याने गर्भवती महिलांनी घ्यावी खास काळजी, गर्भातील बाळावर येणार नाही संकट

Grahan in Pitru Paksha 2024: यंदा शेवटचे चंद्रग्रहण पितृ पक्षात आले आहे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. पुढील काही कामे ग्रहण संपल्यावर केल्यास गर्भातील बाळावर कोणतेही संकट येणार नाही.

Puja Bonkile

Grahan in Pitru Paksha 2024: यंदा वर्षातील शेवटचे आणि दूसरे चंद्र ग्रहण आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते भारतात दिसणार नाही. यंदा चंद्रग्रहण पितृपक्षात आले आहे. हिंदू धर्मात १५ दिवसाच्या पितृपक्षाला खुप महत्व आहे. या दिवसात पितरांना तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. पण या काळात गर्भवती महिलांनी काही नियममांचे पालन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे गर्भातील बाळावर संकट येणार नाही. चंद्रग्रहण संपल्यावर गर्भवती महिलांनी पुढील कामे करावी.

चंद्रग्रहण संपल्यानंतरही गर्भवती महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसले तरी त्याचे सुतक पाळण्याची गरज नाही. पण ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी पुढील कामे करावे.

स्नान

ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी सर्वात पहिले स्नान केले पाहिजे. यामुळे ग्रहणाची नकारात्मक ऊर्जी नष्ट होईल. तसेच मन प्रसन्न होईल.

देवाची पूजा

गर्भवती महिलांनी मनोभावे देवाची पूजा करावी. देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. यामुळे मनात सकारात्मक विचार येतात आणि मन प्रसन्न राहते. जे बाळासाठी देखील चाेगले असते.

काळे कपडे दान

गर्भवती महिलांनी ग्रहणा दरम्यान काळे कपडे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे ग्रहणात माता आणि बाळावर कोणतेही संकट येत नाही. तसेच सकारात्मक ऊर्जा वास करते.

गंगजाल शिंपडावे

गर्भवती महिलांनी स्नान केल्यानंतर स्वत:वर आणि घरात गंगजाल शिंपडावे. यामुळे ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा कमी होईन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

पुढील वस्तू करा दान

तुम्ही चंद्रग्रहण संपल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार खाद्यपदार्थ , फळे, भाज्या किंवा पैसे दान करू शकता. यामुळे माता आणि बाळावर कोणतेही संकट येणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT