Black pepper Esakal
आरोग्य

आजीचा बटवा: काळे मिरे अनेक आजारावर आहेत रामबाण उपाय

भारतात मिरवेलीचे 75 पेक्षा अधिक प्रकार लागवडीत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मिरे हे जगातील सर्वांत जुने व फार महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. चरकसंहिता, बृहत्संहिता व तमिळ वाङ्‌मयात त्याचे पुष्कळ उल्लेख आढळतात. इ. स. पाचव्या शतकात भारतातून ग्रीसला त्याची निर्यात होत असावी.

मसाल्यात वापरण्यात येणाऱ्यापैकी एक काळे मिरे आहे. काळे मिऱ्यात खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहे. त्यामुळे याचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. मसाल्यात तिखट म्हणून याचा वापर केला जातो.

भारतात मिरवेलीचे 75 पेक्षा अधिक प्रकार लागवडीत आहेत. केरळात कल्लुवल्ली, बालनकोट्टा, करिमुंडा आणि कोट्टानड हे जुन्या प्रकारांपैकी जास्त उत्पन्न देणारे प्रकार आहेत. हे काळे मिरे जगात सर्वत्र पिकत नाही. मात्र, भारतात मोठ्याप्रमाणात पिकते. हे औषधी काळे मिरे अल्यामुळे जगभरातून याला मागणी आहे.

● डेंग्यू तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासावर काळ्या मिरीचा मारक परिणाम होतो.

● डासांची अंडी मिरीमुळे नष्ट होण्यास मदत होते.

● काळे मिरेची पावडर कर्करोग आणि पित्तविरोधी आहे.

● पित्तामुळे पोटात गुडगुड किंवा भगभग होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.

● मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूकही वाढते.

● काळया मिरीमध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो. आणि पायपॅरीनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे व्यक्तीच्या प्रकृतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारच्या सुधारणा होऊ शकतात.

● काळे मिरे आणि वेलदोडा (विलायची) समप्रमाणात घेऊन भुकटी करुन ती घेतल्यावर हगवणीवर गुणकारी ठकरे.

● दरम्यान, काळ्या मिरीवर संशोधन करण्यात येत आहे.

● पायपॅरीनवर कॅन्सर प्रतिबंधक औषध म्हणून संशोधन करण्यात येत आहे. पायपॅरीन हे शरीरातल्या काही कर्करोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंचा नायनाट करु शकते. तसेच पायपॅरीन हे जनावरांनासुद्धा उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार भाकरी फिरवणार, अजित दादांचे २२ आमदार गुप्त भेटले?; पटेल -तटकरेंनीही घेतली भेट

VIDEO : देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायेत..राहुल गांधींचा हल्लाबोल, 'त्या' व्हिडीओवरून केलं लक्ष्य

Parle Share: मोदी-मेलोनींच्या मेलोडीचा इफेक्ट; 46 टक्के घसरलेला शेअर अचानक तेजीत, पण गुंतवणूकदारांचा झाला गेम

Latest Marathi News Live Update : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

'आमचं लग्न 30 मिनिटातच झालं होतं' अनिल कपूर यांनी सांगितला लग्नाचा किस्सा, म्हणाले...'ना हनीमून ना...'

SCROLL FOR NEXT