Grandmother's Batwa Ambe Halad Esakal
आरोग्य

आजीचा बटवा: गुणकारी अशा आंबेहळदीचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

मुक्का मार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.

सकाळ डिजिटल टीम

Grandmother's Batwa: पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली की आजीबाईच्या बटव्यातून हळूच आंबेहळद निघायची. कारण त्याकाळात आतासारखे दवाखाने किंवा हॉस्पिटल नव्हतच त्यामुळे वैदयबुवा असो किंवा घरचा आजीचा बटवा शरीरावर कोणताही मार लागला की त्यावर आंबेहळदीचा लेप लावला जाई.

माझ्या लहानपणी सुध्दा जेव्हा जेव्हा मी खेळता खेळता पडले असेल तेव्हा प्रत्येक वेळी आजी तिच्या पिशवीतून आंबेहळद काढायची ती चुल्हीवर शिजवायची आणि मग जिथे लागल असते तिथ लावून द्यायची .

कालांतराने प्रत्येकाच्या घरातून आंबेहळद हळूहळू कमी झाली आणि त्याची जागा पेनकिलर किंवा अन्य औषधांनी मलमांनी घेतली. परंतु, आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्यामुळे आज आपण या लेखात आंबेहळदीचे कोणते ते फायदे आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

● मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

● जर रक्त गोठले असेल तर रक्ताचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी. आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त गोठलेल्या जागेवर लावावी.

● शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा.

● आंबेहळदीमुळे पाठीवर तसेच अंगावरील पूरळ दूर होतात.

● आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्याचा रंग उजळतो.

● दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT