Green Tea Disadvantage esakal
आरोग्य

Green Tea Disadvantage: ग्रीन टी पिताय? मग हा धक्कादायक खुलासा एकदा वाचाच; तुमचे गैरसमज दूर होतील

बड्या अभिनेत्याच्या या संदर्भातील जाहिराती बघून तुम्हीही ग्रीन टीच्या मोहात पडले असाल तर ग्रीन टी पिण्याआधी व्हा सावध

सकाळ ऑनलाईन टीम

Green Tea Side Effects: फिट राहाण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आपण ग्रीन टी बेस्ट असल्याचे समजतो. हा तुमचाच नाही तर अनेकांचा गैरसमज आहे. ग्रीन टी प्यायल्याने तुम्ही स्लीम आणि फिट बनता असे दावेही केले जातात. बड्या अभिनेत्याच्या या संदर्भातील जाहिराती बघून तुम्हीही ग्रीन टीच्या मोहात पडले असाल तर ग्रीन टी पिण्याआधी व्हा सावध. ही माहिती तुमच्या साठी नक्कीच उपयोगाची ठरेल.

डायबिटीज, स्थूलपणा आणि हृदयविकार असणाऱ्या रूग्णांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अतिप्रमाणात सेवनाने तुमच्या यकृताला धोका निर्माण होऊ शकतो. द जर्नल ऑफ डायटरी सप्लिमेंटच्या अभ्यासात ही धक्कादायक बाब उघड झालीय. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचं अँटी ऑक्सीडंट असतं ज्यामुळे तुमच्या यकृतावर सूज येऊ शकते.

गेल्या वर्षभरापासून संशोधक ग्रीन टी सेवन करणाऱ्यांचा अभ्यास करत होते. या अभ्यासात पाळी गेलेल्या महिलांचारही समावेश करण्यात आला होता. यात तब्बल एक हजार महिला होत्या. तीन महिन्यांचा डेटा यात गोळा करण्यात आला होता. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ग्रीन टी चे साईड इफेक्ट्स

अभ्यासात हाय रिस्क जीनोटाइपवाल्या महिलांच्या यकृताला 80 टक्के तर लो रिस्क असेल्या महिलांच्या यकृतावर 30 टक्के सूज आल्याचं आढळून आलं. एक कप ग्रीन टीमध्ये जवळपास 2 मिलीग्रॅम कॅफीन असतं. कॅफीनमुळे चक्कर येणे, कमी झोप येणे, उलटी, अस्वस्थता अशा लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. जादा ग्रीन टी प्यायल्यानं शरीरातील लोहाचं प्रमाणही कमी होऊ शकतं.

ग्रीन टीचे हे साईड इफेक्ट्स लक्षात घेता ग्रीन टी दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा पिऊ नये. गरोदर महिलांनी तर ग्रीन टी पिणे आवर्जून टाळावे. कारण त्याचे गंभीर दुष्परिणान तुमच्या आरोग्यावर होऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT