Gudi Padawa 2024 Sakal
आरोग्य

Healthy Life: उभारू गुढी आरोग्याची...! निरोगी अन् तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

निरोगी आरोग्यासाठी जाणून घ्या तीन मूलभूत नियम

साक्षी राऊत

Gudi Padwa take care of your health your physical and mental health will be good

'माझं आरोग्य माझ्या हाती, ते जपण्यासाठी मी स्वतःच घेईल काळजी', असा संकल्प यंदा गुढीपाडव्यानिमित्त घेतल्यास पुढील वर्षापर्यंत तुमचे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यसुद्धा शंभर टक्के उत्तम राहील. आपल्या आरोग्याची आपणच उत्तम काळजी घेतल्यास शासनापुढेही हतबल होण्याची गरज भासणार नाही. तेव्हा यंदाच्या गुढीपाडव्याला स्वतःच्या आरोग्यासाठी एक प्रामाणिक संकल्प घेत, आरोग्याची गुढी उभारावी, असे डॉ. अविनाश सावजी म्हणाले.

गुढपाडव्याच्या निमित्ताने डॉ. अविनाश यांनी सकाळची संवाद साधताना, अलीकडच्या काळात निरोगी आरोग्यासाठी नव्वद टक्के प्रयत्न स्वतःच करावे लागतात आणि उरलेल्या दहा टक्के गंभीर आजारांसाठी केवळ डॉक्टरांवर अवलंबून राहावे असे सांगितले. लठ्ठपणा, कॅन्सर, मधुमेह आणि यांसारख्या अनेक आजारांना आपण आपल्याच चुकीच्या जीवनशैलीमुळे आमंत्रण देत असतो. यांपासून दूर राहायचे असेल तर स्वपातळीवर कृती करायला हवी, असेही ते म्हणाले.

निरोगी आरोग्यासाठीचे तीन मूलभूत नियम

  • तोंडावाटे आपण शरीरात घातलेला आहार नैसर्गिक हवा. प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. उदा. भाज्या, फळे,

  • निरोगी आरोग्यासाठी शारीरिक हालचाल फार महत्त्वपूर्ण

  • शरीरात अनेक सकारात्मक रसायनांचा समावेश आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी मनात सकारात्मक वातावरण असायला हवे.

  • उत्तम आहार आणि खाण्याच्या वेळा जपा

  • साधारण सुर्यास्तानंतर खाणे टाळावे. सकाळी १०-१२ या वेळेत तर संध्याकाळी ७-८ या वेळेत जेवण करावे.

  • ३२ वेळा चावून खाण्याचा नियम पाळावा.

तीन प्रकारचे व्यायाम आवश्यक

१) कार्डीओ - ४५ मिनिटे

२) सूर्यनमस्कार - ३० मिनिटे

३) मसल बिल्डिंग एक्सरसाइज - २० मिनिटे

तंबाखू, घुटका आणि यांसारख्या अनेक घातक पदार्थांच्या जाहिराती समाज मध्यमांवर सर्सास दिसून येतात. यावर आळा घातल्यास पुढील पिढी व्यसनांच्या आहारी जाणार नाही. तेव्हा शासनापुढे आरोग्य सुविधेत वाढ करण्याच्या मागणीपेक्षा अशा घातक पदार्थांच्या जाहिराती बंद करण्याची मागणी करणे जास्त गरजेचे आहे.

डॉ. अविनाश सावजी, संचालक प्रयास, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचा थरार! मार्केट यार्डमध्ये तरुणाचा खून, बिबवेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT