Fruits For Hairs esakal
आरोग्य

Fruits For Hairs : घनदाट अन् मजबूत केस हवे? मग, रोज खा 'ही' फळे, केसांना मिळेल चमक.!

Fruits For Hairs : केसांची बाहेरून काळजी घेण्यासोबतच त्यांना आतून योग्य पोषण मिळणे, खूप गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Fruits For Hairs : लांब आणि घनदाट केस प्रत्येकाला हवे असतात. आपले असे केस असावेत यासाठी महिला नाना प्रकारचे उपाय करतात. परंतु, आजकाल बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अपुरा आहार इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर ही व्हायला लागला आहे. केसांची बाहेरून काळजी घेण्यासोबतच त्यांना आतून योग्य पोषण मिळणे, खूप गरजेचे आहे. यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये तर केस गळणे, केस खराब होणे, केस कमजोर होणे इत्यादी समस्या सुरू होतात. यासाठी केसांवर विकतच्या केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थ समाविष्ट करू शकतात. केसांच्या मजबूतीसाठी आणि केसांना चमक यावी यासाठी तुम्ही आहारात काही फळांचा समावेश करू शकता. कोणती आहेत ही फळे? चला तर मग जाणून घेऊयात.

किवी

किवी हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते. केसाच्या वाढीसाठी, मजबूतीसाठी व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे, किवीचे सेवन अवश्य करा. यासोबतच किवीचे सेवन केल्याने स्काल्पचे रक्तपरिसंचारण वाढते, आणि केसांची चमक वाढण्यास मदत होते.

आवळा

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी आवळा अतिशय लाभदायी आहे. आवळ्याचे सेवन केल्याने आपले आरोग्य, केस आणि त्वचा उत्तम राहते. हे कदाचित तुम्ही आतापर्यंत वाचले असेल. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने केसांना आतून पोषण मिळते आणि केस मुळापासून मजबूत होतात. शिवाय, केसांना छान चमक येते.

केळी

कॅल्शिअम आणि इतर पोषकघटकांनी समृद्ध असलेली केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केळीमध्ये व्हिटॅमिन ए, फायबर, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शिअ भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे, केळीचे सेवन केल्याने केसांची मजबूती आणि चमक वाढण्यास मदत होते.

पेरू

पेरूची आवक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले पेरू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि केस चमकदार होण्यास मदत होते. पेरू व्यतिरिक्त तुम्ही केसांच्या वाढीसाठी आहारात बेरीज, संत्री, द्राक्षे, हंगामी फळे आणि पपईचा समावेश करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT