Hair Care esakal
आरोग्य

Hair Care : केसांची ग्रोथ हवीय? रोज खा हे 5 सुपरफुड्स, केस होतील श्रद्धासारखे सिल्की अन् लाँग

आज आम्ही तुम्हाला श्रद्धासारखे स्मूथ व हेल्दी केसांसाठी काही उपाय सांगणार आहोत

साक्षी राऊत

Hair Care : बॉलीवूडच्या सर्वात गोंडस अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रद्धा कपूरसारखे हेल्दी, मुलायम आणि लांब केस मिळवण्यासाठी तरुणी वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेत असतात. त्यासाठी तरुणी ब्युटी पार्लरमध्ये हेअर ट्रीटमेंट घेत केसांवर भरपूर पैसे खर्च करत असतात. मात्र तुम्हाला माहितीये काय? हेअर ट्रिटमेंट्सने तुमच्या केसांचं नुकसानही होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला श्रद्धासारखे स्मूथ व हेल्दी केसांसाठी काही उपाय सांगणार आहोत.

अॅवोकॅडो हे महागडे फळ असले तरी ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, तुम्ही ते सॅलेटच्या स्वरूपात खाऊ शकता. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई टाळूमध्ये असलेल्या छिद्रांना दुरुस्त करतात, ज्यामुळे केस वेगाने वाढू लागतात.

केळी हे एक अतिशय सामान्य फळ आहे जे केसांचे पोषण भरून काढण्यास फायदेशीर ठरते, कारण त्यात भरपूर पोटॅशियम असते. हे पोषण आणि मॉइश्चरायझ करणे सोपे करते. ते खाल्ल्याने फायदा होईलच पण तुम्ही हेअर मास्क बनवून डोक्याला लावू शकता.

चिया सिड्स खाण्याचे तसे तर अनेक फायदे आहेत पण ते खाल्ल्याने केसांना खूप फायदा होतो, केसांच्या मुळांना पोषण मिळते. यासोबतच केस गळण्याची समस्याही संपते.

गोजी बेरी हे एक स्वादिष्ट फळ आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अमीनो ऍसिड असतात. तसेच ते खाल्ल्याने फॉस्फरस, तांबे आणि लोह मिळते ज्यामुळे केसांची वाढ आणि पोषण होण्यास मदत होते. (Hair Care)

रताळे हे अतिशय पौष्टिक आहे, त्यात बीटा कॅरेटीन आढळते, जे केस निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे टाळूमधील बंद छिद्रे उघडू लागतात, त्यामुळे केस वेगाने वाढू लागतात.

हे सुफरफुड्स तुमच्या डाएटमध्ये असल्यास तुमचे केसही दिसतील श्रद्धासारखे स्मूद आणि सिल्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT