Body Lever sakal
आरोग्य

Fatty Liver : ‘फॅटी लिव्हर’ने वाढविली काळजी

मद्यपान केल्यानेच आता यकृताचा विकार होतो, ही संकल्पना आता मागे पडली आहे. कधीही दारूला स्पर्श न केलेल्या रुग्णांनाही ‘फॅटी लिव्हर’ होण्याचा धोका वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मद्यपान केल्यानेच आता यकृताचा विकार होतो, ही संकल्पना आता मागे पडली आहे. कधीही दारूला स्पर्श न केलेल्या रुग्णांनाही ‘फॅटी लिव्हर’ होण्याचा धोका वाढत आहे.

पुणे - मद्यपान केल्यानेच आता यकृताचा विकार होतो, ही संकल्पना आता मागे पडली आहे. कधीही दारूला स्पर्श न केलेल्या रुग्णांनाही ‘फॅटी लिव्हर’ होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे या आजाराने वैद्यकीय क्षेत्रापुढील काळजी वाढविल्याचे दिसते.

आरोग्यपूर्ण शरीराचा चांगल्या यकृताशी थेट संबंध असतो. चयापचय आणि शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यात यकृताचे कार्य महत्त्वाचे असते. यकृताचे आरोग्य चांगले ठेवणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. मात्र, या बद्दल जनजागृती नसल्याने अयोग्य जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे यकृताचे आरोग्य ढासळत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. जगभरातील यकृताशी संबंधित आजारांपैकी १८ टक्के आजार हे केवळ भारतात आढळतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याबद्दल मणिपाल रुग्णालयातील गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजिस्ट डॉ. हर्षल राजेकर म्हणाले, “यकृताशी संबंधित आजारांमध्ये सामान्य आजार म्हणजे ‘फॅटी लिव्हर आहे. या स्थितीला ‘नॅल्फेड’ (नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज) असेही म्हणतात. ‘नॅल्फेड’ने ग्रस्त रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांमध्ये यकृतातील पेशींना इजा झालेली असते. यकृताला सूज आलेली असते. फॅटी लिव्हर हा वाढता आजार आहे आणि त्याची सुरवातीला लक्षणे दिसत नाहीत पण अंतिम टप्प्यात हा आजार गेल्यास त्याचे अपरिवर्तनीय नुकसान होते.'

फॅटी लिव्हर

  • ‘फॅटी लिव्हर डिसीज’ हे अल्कोहोलिक (एएफएलडी) किंवा ‘नॉन अल्कोहोलिक’ (एनएएफएलडी) या दोन प्रकारचे असतात.

  • ‘एएफएलडी’ हा आजार अतिरिक्त मद्यपान केल्यामुळे होतो. यकृताचा कर्करोग किंवा यकृत निकामी होण्याचा धोका असतो.

  • ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ प्राथमिक दृष्ट्या पाहिल्यास उच्च रक्तदाब, इन्शुलिनचा प्रतिकार केल्यामुळे आणि स्थूलतेने होतो.

काय आहेत लक्षणे

  • सातत्याने पोटात दुखणे/ पोटाच्या वरच्या भागात दबाव निर्माण होणे

  • डोळे आणि त्वचा पिवळी पडणे यांसारखी काविळीची लक्षणे दिसून येणे.

  • थकवा, अशक्तपणा, मळमळ आणि भूक न लागणे

  • सातत्याने पोटाच्या तक्रारी जसे उलट्या आणि जुलाब होणे

  • मनात गोंधळ निर्माण होऊन स्मरणशक्ती कमी होणे, अचानक वजन कमी होणे

  • शरीरात द्रवपदार्थ साठून राहिल्यामुळे ओटीपोट आणि पायांना सूज येणे

हे करा

  • आरोग्यपूर्ण वजन राखा

  • अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा.

  • आरोग्यपूर्ण आहार घ्या.

  • संपूर्ण दिवसभर सक्रिय रहा

  • आजाराची लक्षणे असल्यास नियमित तपासणी करत रहा.

यकृताच्या आजाराची साधारणपणे सुरवातीची लक्षणे दिसून येत नाही आणि हे आजार अतिशय पुढच्या टप्प्यात दिसून येतात, विशेषकरुन अधिकतर नुकसान होऊन गेलेले असते,

- डॉ. हर्षल राजेकर, गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT