Aerobic Exercise esakal
आरोग्य

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Aerobic Exercise : निरोगी आरोग्य हवे असेल तर त्यासाठी आपण शारिरीक आणि मानसिकरित्या तंदूरूस्त असणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Aerobic Exercise : निरोगी आरोग्य हवे असेल तर त्यासाठी आपण शारिरीक आणि मानसिकरित्या तंदूरूस्त असणे गरजेचे आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर व्यक्तीचे आरोग्य निरोगी असते, असे मानले जाते. शारिरीक आरोग्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते आणि मानसिक आरोग्यामुळे आनंदी आणि तणावमुक्त जीवन मिळते.

आजकाल फिटनेस राखण्यासाठी विविध प्रकारचे योगा आणि व्यायाम प्रकार केले जातात. या व्यायाम प्रकारांपैकीच एक असलेला एरोबिक हा व्यायाम प्रकार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एरोबिक व्यायाम शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. आज आपण एरोबिक व्यायामाचे विविध प्रकार जाणून घेणार आहोत. जे तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता.

स्विमिंग

स्विमिंग हा देखील एरोबिक व्यायाम प्रकारातील एक महत्वाचा व्यायाम प्रकार आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. विशेष म्हणजे पोहल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. एकूणच मानसिक आणि शारिरीक आरोग्य तंदूरूस्त ठेवण्यासाठी स्विमिंग करणे फायदेशीर आहे.

धावणे

एरोबिक व्यायाम प्रकारांपैकी हा एक महत्वाचा व्यायाम प्रकार आहे. धावल्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. जसे की, आपल्या शरीरातील कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न होतात. या व्यायामाद्वारे तुम्ही जलद श्वास घेता ज्यामुळे, फुफ्फुसे मजबूत होण्यास मदत होते.

तसेच, धावल्यामुळे कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होते. काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, लोक धावताना अनेकदा सकारात्मक विचार करतात. ज्यामुळे, तुम्हाला तणावमुक्त वाटते.

एरोबिक डान्स

एरोबिक व्यायाम प्रकारातील हा अत्यंत महत्वाचा आणि तितकाच फायदेशीर व्यायाम प्रकार आहे. जर तुम्हाला जास्त शारिरीक श्रम न घेता उत्तम फिटनेस राखायचा असेल तर, तुमच्यासाठी एरोबिक डान्स हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

यामध्ये तुम्हाला नृत्याचा ही आनंद घेता येईल आणि तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. एरोबिक डान्स केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि स्नायूंची ताकद वाढते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा-ओबीसी वाद पेटलाय? आरक्षणावर मनसे प्रमुख राज ठाकरेंचं थेट भाष्य; म्हणाले, 'या सगळ्याची उत्तरं तुम्हाला एकनाथ शिंदेच देतील'

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी आवाज वाढवताच सरकार वठणीवर; शौचालयासह सगळ्या सुविधा केल्या उपलब्ध

Weather News Maharashtra : पावसाचा मुक्काम वाढणार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; हवामान विभागाचा अंदाज, समुद्रात वादळी स्थिती

Latest Marathi News Updates: पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक घाट या परिसरासा ठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

Mumbai Kokan Ro-Ro Ferry: मुंबई–कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! १ सप्टेंबरपासून रो-रो फेरी सेवा सुरू, फ्लाइटपेक्षा कमी खर्चात प्रवास

SCROLL FOR NEXT