Benefits of Asparagus esakal
आरोग्य

Benefits of Asparagus : महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी रामबाण औषधी मानली जाते शतावरी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Benefits of Asparagus : अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये शतावरीचा वापर प्रामुख्याने केला जातो. महिलांच्या आरोग्यासाठी शतावरी अतिशय रामबाण औषधी मानली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Asparagus : निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे. या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. शतावरी ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे, जी पर्वतांमध्ये आढळते. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये तिचा वापर प्रामुख्याने केला जातो. महिलांच्या आरोग्यासाठी शतावरी अतिशय रामबाण औषधी मानली जाते.

शतावरीमुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम शतावरी करते. या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, फायबर इत्यादी पोषकघटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. आज आपण शतावरीचे इतर आरोग्यदायी फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

उच्च रक्तदाबासाठी फायदेशीर

शतावरी आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ आणि टाकाऊ घटक काढून टाकण्याचे काम करते. विशेष म्हणजे शतावरीमुळे नैसर्गिक लघवीचे प्रमाण नियमित होण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. यासोबतच UTI सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

गरोदरपणात लाभदायी

शतावरीमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक आढळून येतात. फोलेटचे प्रमाण ही शतावरीमध्ये मुबलक आढळून येते, त्यामुळे, गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या समस्या दूर होतात. या कारणामुळेच डॉक्टर गरोदरपणात शतावरीचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

शतावरीमध्ये असलेले फोलेट गरोदरपणाच्या सुरूवातीच्या महिन्यात बाळाच्या जन्माशी संबंधित असलेले दोष आणि जोखिम कमी करते. ज्यामुळे, बाळाचे आरोग्य निरोगी राहते.

सूज कमी होते

शतावरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. या अँटिऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि शरीरावरील सूज येण्याची समस्या देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते.

पचनक्षमता सुधारते

शतावरीमध्ये फायबरचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, शतावरीचे सेवन केल्यावर पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. पोटाच्या समस्या कमी होऊन पचनक्रिया व्यवस्थित होते. पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठतासारख्या समस्या जर तुम्हाला भेडसावत असतील तर शतावरीचे सेवन अवश्य करा. तुमच्या पोटाच्या समस्या दूर करण्यास शतावरी मदत करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT