Clove Eating Benefits sakal
आरोग्य

Clove Eating Benefits नियमित एक लवंग खाल्ल्यास मिळतील 'हे' मोठे लाभ

लवंगमध्ये असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे पोटाच्या आरोग्यापासून ते त्वचेपर्यंत अनेक लाभ मिळतात.

सकाळ डिजिटल टीम

Lavang Khanyache Fayde : आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक गरम मसाले आहेत, ज्याच्या वापरामुळे स्वयंपाक स्वादिष्ट होतो. शिवाय यामुळे खाद्यपदार्थांचा रंगही वाढतो. महत्त्वाचे म्हणजे या मसाल्यांच्या सेवनामुळे आरोग्यास अनेक फायदेही मिळतात. 

या लेखाच्या माध्यमातून आपण लवंगाचे सेवन केल्याने आरोग्यास काय लाभ मिळू शकतात, याची माहिती जाणून घेणार आहोत. लवंगमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. ज्यामुळे संपूर्ण आरोग्यास लाभ मिळतात. 

100 ग्रॅम लवंगमध्ये कोणकोणते गुणधर्म असतात?   

  • कार्बोहायड्रेट  61.21 ग्रॅम

  • प्रोटीन 5.98 ग्रॅम

  • फॅट्स 20.07 ग्रॅम 

  • फायबर 34.2 ग्रॅम, 

  • कॅल्शियम  646 मिलीग्रॅम  

लवंग खाण्याचे फायदे 

  • काही जण मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खातात. यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते. 

  • शरीराची पचनप्रक्रियाही मजबूत होते. 

  • सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.

  • बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. 

  • रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. 

  • लवंगमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आजारांशी लढा देण्यास शारीरिक क्षमता वाढते.  

  • लवंगीमुळे दातांचे दुखणेही कमी होते. कारण यामध्ये युजेनॉल नावाचे वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT