Benefits Of Custard Apple esakal
आरोग्य

Benefits Of Custard Apple : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे सीताफळ, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

Benefits Of Custard Apple : सीताफळामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी इत्यादी पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Custard Apple : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. संतुलित आहारामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्यांसोबतच फळांचा ही समावेश असणे फायदेशीर ठरते. आपल्याकडे प्रत्येक सिझननुसार विविध प्रकारची फळे मार्केटमध्ये मिळतात. या फळांपैकीच एक असलेले सीताफळ खायला सगळ्यांनाच आवडते.

हे एक प्रकारचे गोड आणि रसाळ फळ आहे. सीताफळामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी इत्यादी पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते. सीताफळाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि मधुमेहापासून आराम मिळण्यास मदत होते. आज आपण सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

पचनक्षमता सुधारते

सीताफळामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्सचे प्रमाण आढळते. या फायबर्समुळे पचनसंस्था तंदूरूस्त राहते आणि पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि जुलाबाचा वारंवार त्रास होत असेल तर अशा लोकांनी सीताफळाचे जरूर सेवन करावे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

सीताफळ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सीताफळामध्ये ल्यूटीन नावाचे पोषकतत्व आढळते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे, जे डोळ्यांचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करते. त्यामुळे, सीताफळाचे अवश्य सेवन करा आणि हेल्दी राहा.

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, अशा लोकांसाठी सीताफळ अतिशय लाभदायी आहे. सीताफळामध्ये विपुल प्रमाणात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आढळते. जे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांच्या कार्यास प्रोत्साहन देते.

विशेष म्हणजे चवीला जरी हे फळ गोड असले तरी याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फार कमी आहे. त्यामुळे, मधुमेह असलेल्या व्यक्ती देखील सीताफळाचे सेवन करू शकतात. परंतु, याचे अतिरिक्त सेवन करणे टाळावे.

रक्ताची कमतरता दूर होते

सीताफळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास देखील मदत होते. ॲनिमियासारख्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सीताफळाचे अवश्य सेवन करावे. सीताफळामध्ये लोहाचे विपुल प्रमाण आढळते. ज्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Latest Marathi News Live Update : आखाती देशांच्या युद्धाचे पडसाद थेट वाशिम जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी ६० वर्षांचा होईपर्यंत आयपीएल खेळणार... म्हणतो कसा, अवघड आहे, पण मी प्रयत्न नक्की करेन...

SCROLL FOR NEXT