Clay Pot Water sakal
आरोग्य

Clay Pot Water : फ्रीजऐवजी प्या माठातील पाणी; हे होतील फायदे

आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला, मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म

सकाळ वृत्तसेवा

परभणी : उन्हाळ्यात माठातून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. माठातले थंडगार पाणी पिऊन तहान भागते. आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे.

मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने ती रोग दूर करणारी असल्याचेही आयुर्वेदात म्हटले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल, तर माठातले पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रिजमधले गार पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात. तर माठातले पाणी तुम्हाला निरोगी ठेवते.

आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. सकाळी थंडी व दुपारी बारा वाजतानंतर कडक उन्ह पडत आहे. सध्या परभणीचे तापमान ३८ अंशाच्या जवळपास जात आहे. त्यामुळे थंड पाण्याचीही मागणी वाढली आहे.

त्यामुळे माठातील पाण्याची सर्वांनाच गरज लागत आहे. त्यामुळे माठाची मागणी वाढली आहे. त्यामुळे माठ विक्रेत्यांनी शहरातील शनिवार बाजार व वसमत रस्त्यावर माठीची दुकाने लागली आहेत. यात काळ्या मातीच्या माठाची मागणी जास्त प्रमाणात असल्याचे विक्रेत्याने सांगितले. लाल मातीच्या माठाची मागणी कमी असली तरी त्याला पसंती देणारे अनेकजण असतात असेही ते म्हणाले.

होतात हे फायदे

  • माठातलं पाणी प्यायल्याने टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत.

  • फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो. माठातले प्यायल्याने दुखणार नाही.

  • माठातले पाणी पिउन गळ्याला आराम मिळेल.

  • उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे.

  • शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.

  • फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते.

  • माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात.

  • उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो.

  • गॅसच्या समस्येपासून आराम

  • माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते.

  • पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

  • रक्तदाब राहतो नियंत्रणात

  • त्वचेच्या समस्या होतात दूर

  • - मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असतो. माती विषारी द्रव्ये शोषून घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT