Dragon Fruit Benefits Sakal
आरोग्य

Dragon Fruit Benefits: सकाळी रिकाम्या पोटी खा ड्रॅगन फ्रुट, मिळतील जबरदस्त फायदे

नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रुटचा (Health Benefits of Dragon Fruit in Marathi) समावेश केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Dragon Fruit Health Benefits & Nutrition : लाइफस्टाइल हेल्दी राहावे, याकरिता बहुतांश जण डाएटमध्ये ड्रॅगन फ्रुटचा आवर्जून समावेश करतात. या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. 

याशिवाय या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. महत्त्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Benefits in Marathi) सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरास अनेक पोषकघटकांचा पुरवठा होऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती…  

फ्री रेडिकल्सपासून होतो बचाव  

ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणूनच ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्यास शरीर आणि त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो.  ड्रॅगन फ्रूटमधील औषधी गुणधर्मांमुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते.  ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक अॅसिड आणि बीटासायनिन यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पोटाच्या आरोग्याकरिता लाभदायक 

जर आपण नियमित सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल. सकाळच्या नाश्त्यामध्येही आपण ड्रॅगन फ्रुटचा समावेश करू शकता. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही. ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे शरीराचे वजनही नियंत्रणात राहते.   

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर 

आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले जाऊ शकते. या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.  प्रोबायोटिक्समुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. सोबतच आतड्यांशी संबंधित समस्याही कमी करण्यास हे. घटक मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते  

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण सकाळच्या वेळेस ड्रॅगन फ्रुट खाऊ शकता. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी या पोषकघटकाचा साठा अधिक असतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. नाश्त्यामध्ये  आपण ड्रॅगन फ्रुटचा समावेश केल्यास आपल्या शरीराचे सर्दी- खोकला यासारख्या आजारांपासूनही संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.  

रक्तवाढीस पोषक 

ड्रॅगन फ्रुटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. नियमित रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यास याद्वारे शरीरास लोहाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होण्यास मदत मिळेल. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही भरून निघेल. महत्त्वाचे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही वाढेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT