हृदय आणि मन निरोगी ठेवण्यासाठी, आपण आपल्या आहारात ओमेगा 6 आणि ओमेगा 9 चा वापर भरपूर केला पाहिजे. जाणून घ्या ओमेगा 6, 9 चे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत?
आपले वय जसे वाढत जाते तसे शरीरात विटामिन, मिनरल आणि पोषक तत्वे जसे की प्रोटीन,फाइबर, फॅट ची कमतरता जाणवू लागते. ही कमतरता भरून काढण्यासाठी शरीराला न्यूट्रीशियन आणि 9 प्रकारच्या फॅटी अॅसिडची गरज असते. यातील ओमेगा 6 आणि ओमेगा 9 या तुमच्या हृदयाच्या आजारांना दूर करण्यासाठी मदत करतात. शरीरातील ब्लड प्रेशरला सुरळीत करण्यासाठी आणि हाडांना मजबूत बनवण्यासाठी तसेच डोळ्यांना आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी ओमेगा 6 आणि ओमेगा 9 फायदेशीर ठरतो. कॅन्सरला दूर करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. याच्या कमतरतेमुळे डिप्रेशन, तनाव, आळस, थकवा येतो. तुमच्या मूडला ठीक करण्याचे काम देखील ओमेगा फॅटी अॅसिड करते. खुपश्या नैसर्गिक गोष्टीत ओमेगा 3,6 आणि 9 पाहायला मिळतात. चला तर जाणून नैसर्गिक स्रोत कोणते आहेत?
हृदय आणि मन निरोगी ठेवण्यासाठी, आपण आपल्या आहारात ओमेगा 6 आणि ओमेगा 9 चा वापर भरपूर केला पाहिजे.
ओमेगा 6 आणि 9 फॅटी अॅसिडचे नैसर्गिक स्त्रोत ( Natural Food Source of Omega 6 and 9 Fetty Acid)
शेंगदाणे: शेंगदाणे हे ओमेगा 6 आणि 9 फॅटी अॅसिडचे फूड सोर्स आहे. तसेच हे भूक शांत करते. शेंगदाण्यात तुम्हाला 4 ग्रॅम ओमेगा -6 मिळते.
सूर्यफूल तेल: सूर्यफूलाचे बियाणे आणि तेलात भरपूर प्रमाणात ओमेगा फॅटी अॅसिड असतात. सूर्यफूल तेलाच्या 1 चमच्यामध्ये सुमारे 10 ग्रॅम ओमेगा -6 फॅटी अॅसिड आढळतात. तसेच शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये पुरवतात.
मासे : मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे हे ओमेगा 6 फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे. या व्यतिरिक्त, ओमेगा -3, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक देखील यात उपलब्ध आहेत.
अक्रोड: बहुतेक लोकांना माहित नाही की मेंदू निरोगी ठेवण्याबरोबरच अक्रोड हे ओमेगा -6 फॅटी अॅसिडचे चांगले स्त्रोत आहेत. जर तुम्ही अक्रोडचे कप खाल्ले तर शरीराला त्यातून 9 ग्रॅम ओमेगा -6 फॅटी अॅसिड मिळते.
ऑलिव्ह ऑईल : शरीराला ऑलिव्ह ऑइलमधून ओमेगा 3, 6 आणि 9 फॅटी अॅसिड मिळतात. सुमारे 1 चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये 1.2 ग्रॅम ओमेगा -6 फॅटी अॅसिड असतात. ओमेगा फॅटी अॅसिडच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, आपण आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करणे आवश्यक आहे.
भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बिया खाल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. भूक लागल्यावर भोपळ्याचे दाणे स्नॅक म्हणून खाऊ शकता. हे ओमेगा -6 फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध आहे.
तीळ : तीळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तिळाच्या बियांमध्ये ओमेगा -6 आणि 9 फॅटी अॅसिड देखील चांगल्या प्रमाणात असतात. आपल्याला तिळामध्ये भरपूर लोह देखील मिळते. सॅलड किंवा चटणीमध्ये तुम्ही तीळ वापरू शकता.
सोयाबीन : सोयाबीन खूप फायदेशीर आहे. तुम्ही अन्नामध्ये कोणत्याही प्रकारे सोयाबीन वापरू शकता. आपण भाज्या किंवा स्वयंपाकाच्या तेलात सोयाबीन समाविष्ट करू शकता. 1 चमचा सोयाबीन तेलात 7.7 ग्रॅम ओमेगा -6 फॅटी अॅसिड असते. सोयाबीनमध्ये ओमेगा 9 फॅटी अॅसिड देखील आढळतात.
काजू बदाम : रोज काजू बदाम खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहता. काजू आणि बदामांमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड आढळतात. त्यात ओमेगा -9 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळतात. या व्यतिरिक्त, इतर जीवनसत्त्वे आणि पोषक देखील मुबलक आहेत.
हिरव्या भाज्या : तुम्ही ओमेगा 9 फॅटी अॅसिडसाठी हिरव्या भाज्या देखील खाऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. आपण आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.