Benefits Of Paschimottanasan esakal
आरोग्य

Benefits Of Paschimottanasan : मधुमेह आणि किडनीच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते पश्चिमोत्तनासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits Of Paschimottanasan : या योगासनाला ‘सीटेड फॉरवर्ड बेंड’ असे ही म्हटले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Paschimottanasan : योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने आपल्या आरोग्याला चालना मिळते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात. योगासनांचे विविध प्रकार आहेत. त्यापैकीच एक असलेले पश्चिमोत्तनासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.

या योगासनाला ‘सीटेड फॉरवर्ड बेंड’ असे ही म्हटले जाते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

विशेष म्हणजे या योगासनामुळे शरीर लवचिक होते. पश्चिमोत्तनासनाचा दररोज सराव केल्याने तुमचे सर्वांगीण आरोग्य उत्तम राखण्यास मदत होऊ शकते. आज आपण हे योगासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

पश्चिमोत्तनासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • हे योगासन करण्यासाठी तुम्हाला परिपक्वता आवश्यक आहे. जर हे योगासन तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर, योगातज्ज्ञाची अवश्य मदत घ्या.

  • पश्चिमोत्तनासनाचा सराव हा सुरूवातीला तुम्हाला थोडा कठीण वाटू शकतो. परंतु, हळूहळू याचा सराव वाढवल्यास तुम्ही यात परिपक्व होऊ शकाल.

  • या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पाय पसरून जमिनीवर बसा.

  • त्यानंतर, एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे शरीर हळूहळू पुढे वाकवा.

  • आता तुमच्या पायाच्या बोटांना दोन्ही हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे ताठ असायला हवेत.

  • आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • त्यानंतर, तुम्ही सामान्य स्थितीमध्ये या.

पश्चिमोत्तनासनाचे फायदे

  • पश्चिमोत्तनासनाचा नियमितपणे सराव केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

  • यासोबतच मधुमेहाच्या रूग्णांसाठी आणि यकृत किडनीच्या रूग्णांसाठी हे योगासन फायदेशीर मानले जाते.

  • मासिक पाळीच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी या योगासनाचा सराव फायदेशीर ठरू शकतो.

  • दररोज या योगासनाचा सराव केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते आणि चिंता-तणाव कमी करण्यास मदत होते.

  • शरीराच्या टोनिंगसाठी या योगासनाचा सराव लाभदायी आहे.

  • पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांसाठी हे योगासन उपयुक्त आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT