Benefits of finger Millet esakal
आरोग्य

Benefits of finger Millet : उन्हाळ्यात नाचणीचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायी, जाणून घ्या फायदे

Benefits of finger Millet : नाचणी हे कडधान्य आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of finger Millet : नाचणी हे कडधान्य आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. नाचणीमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. नाचणीमध्ये फायबर, कॅल्शिअम, कर्बोदके आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. नाचणीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी ही नाचणी उपयुक्त आहे.

उन्हाळ्यात नाचणीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. नाचणीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. नाचणीचा डोसा, पराठा, नाचणीचे धपाटे, नाचणीचे सार, मोड आलेल्या नाचणीची आमटी इत्यादी. आज आपण उन्हाळ्यात नाचणीचे सेवन केल्याने आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

रक्तातील साखर नियंत्रित राहते

मोड आलेली (अंकुरित) नाचणी ही मधुमेहाच्या रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. कारण, नाचणीमध्ये हाय पॉलिफेनॉल आणि डायटरी फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे, रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात नाचणीचा जरूर समावेश करावा.

पचनक्षमता सुधारते

उन्हाळ्यात खाल्लेले अन्न आणि पेये अनेकदा सहजपणे पचत नाहीत. तसेच, अनेकवेळा तळलेले किंवा जड खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही नाश्त्यामध्ये मोड आलेल्या नाचणीचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत राहते. शिवाय, पोटाच्या समस्यांपासून ही आराम मिळतो.

रक्ताची कमतरता दूर होते

उन्हाळ्यात अंकुरित नाचणीचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. तसेच, रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे, ज्या लोकांना अशक्तपणा किंवा रक्ताच्या कमतरतेची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात नाचणीचा जरूर समावेश करावा.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

मोड आलेल्या नाचणीमध्ये (अंकुरित) फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, नाचणीचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शिवाय, नाचणीचे सेवन केल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात नाचणीचा जरूर समावेश करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT