

Hasan Mushrif statement Sharad Pawar kolhapur
esakal
Sharad Pawar meeting controversy : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेले मतभेद लवकरच संपुष्टात येतील आणि सध्या सुरू असलेला वाद हा केवळ “पेल्यातील वादळ” असल्याचा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य करत पक्षातील नाराजी, महायुतीतील समन्वय, विलीनीकरणाच्या चर्चा आणि विरोधकांच्या टीकेवर स्पष्ट भूमिका मांडली.