Benefits of Vakrasana esakal
आरोग्य

Benefits of Vakrasana : पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि उत्तम पचनक्षमतेसाठी वक्रासन फायदेशीर, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits of Vakrasana : योगामध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. या आसनांपैकीच एक असलेले वक्रासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Vakrasana : रोजचे धावपळीचे जीवन, सतत लॅपटॉपसमोर बसून काम करणे, बिघडलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सतत बसून काम केल्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी इत्यादी अनेक समस्या निर्माण होत आहेत. मग, या समस्या दूर करण्यासाठी विविध उपाय केले जातात.

परंतु, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. योगामध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. या आसनांपैकीच एक असलेले वक्रासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लवचिक योगासनांपैकी एक असलेले हे योगासन पाठीसाठी अतिशय उपयुक्त आहे. या वक्रासनाला 'ट्विस्टेड पोझ' असे म्हटले जाते. आज आपण वक्रासन करण्याची पद्धत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

वक्रासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • वक्रासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पाय पसरून बसा.

  • दोन्ही पायांमध्ये जास्त अंतर ठेवू नका.

  • आता तुमचा डावा पाय गुडघ्यात वाकवून तो उचलून उजव्या गुडघ्याजवळ ठेवा.

  • या स्थितीमध्ये तुमच्या पाठीचा कणा ताठ ठेवा आणि श्वास सोडताना कंबर डाव्या बाजूला वळवा.

  • आता तुमच्या हाताच्या कोपराचा वापर करून दाब देऊन डाव्या पायाचा गुडघा तुमच्या दिशेने खेचा, जेणेकरून पोटावर दाब पडला पाहिजे.

  • या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • आता श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

  • आता दुसऱ्या पायाने हे योगासन पुन्हा करा.

वक्रासनाचे आरोग्यदायी फायदे :

  • नियमितपणे वक्रासनाचा सराव केल्याने शरीराचा लवचिकपणा वाढण्यास मदत होते.

  • पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे योगासन अतिशय उपयुक्त आहे.

  • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या योगासनाचा नियमितपणे सराव करणे फायदेशीर ठरते.

  • या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

  • वक्रासनाचा दररोज सराव केल्याने पाठीचा कणा लवचिक बनतो. ज्यामुळे, पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या दूर होते.

  • रोजच्या कामाचा ताण-तणाव दूर करण्यासाठी वक्रासन फायदेशीर आहे.

  • पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी या योगासनाचा नियमित सराव करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT