Health Care  sakal
आरोग्य

Health Care News: पोट-कंबर आणि मांड्यांवरची चरबी होईल कमी, रोज करा फक्त हे 3 व्यायाम

शरीरावरची वाढत जाणारी चरबी सगळ्यात आधी दिसून येते ती पोटावर, मांड्यांवर आणि कंबरेवर

Aishwarya Musale

पोट आणि मांडीच्या चरबीमुळे तुम्ही तुमची आवडती टाइट फिटिंग जीन्स किंवा लेगिंग घालू शकत नाही का? या दोन भागांमध्ये जमा झालेल्या चरबीमुळे तुमच्या शरीराचा आकार बिघडला आहे का?

तुम्हाला हट्टी चरबीपासून मुक्त व्हायचे आहे, परंतु तुम्हाला जिममध्ये जाणे आवडत नाही? त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही घरच्या घरी हे 3 व्यायाम करून चरबी सहज कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते व्यायाम.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “वाढते वय, आहार आणि खराब जीवनशैली, कमकुवत चयापचय यामुळे पोट आणि मांड्यांवर चरबी सहजपणे जमा होते आणि बहुतेक महिलांना त्यांच्या पोटावर आणि मांड्यांवरील चरबीचा त्रास होतो. हे कमी करण्यासाठी तुम्ही काही व्यायाम करून पाहू शकता. परंतु, चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच, आपली जीवनशैली बदलणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे."

गॉडेस पोज 

या व्यायामामुळे पोट आणि मांड्यांमधील चरबी कमी होते आणि पायांचे स्नायू टोन होतात. याशिवाय, हे अंडाशय आणि मूत्राशयासाठी फायदेशीर आहे आणि श्वसनाच्या समस्यांपासून आराम देते. हा व्यायाम रोज केल्याने तणावही दूर होतो.

गॉडेस पोज करण्याची पद्धत

  • दोन्ही पायांमध्ये किमान ३ फूट अंतर ठेवून उभे रहा.

  • दोन्ही हात जोडून नमस्ते आसन करावे.

  • मग गुडघे वाकवा

  • छाती पुढे ठेवताना खांदे थोडे मागे ठेवा.

  • या स्थितीत काही काळ राहून सामान्यपणे श्वास घ्या.

  • श्वास सोडल्यानंतर मागचा भाग खाली दाबा.

  • मग सामान्य स्थितीत या.

साइड लंजेस

हा एक सोपा लंज व्यायाम आहे, जो तुम्ही रोज करू शकता. हे मांड्या आणि पायांच्या स्नायूंना टोन करते. साइड लंजला स्कंदासन असेही म्हणतात. या आसनात पाय बाहेर काढले जातात आणि शरीर खाली झुकवले जाते. हे पायापासून हिप्‍सच्या सांध्यापर्यंत शरीराच्या सर्व भागांवर कार्य करते.

हाय नीज

हा एक कार्डिओ व्यायाम आहे जो फास्ट केला जातो. हे आपले पाय आणि कोर मजबूत करते. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एका जागी उभे राहून तुमचे पाय जमिनीवरून उचलावे लागतील आणि ते वेगाने बदलावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT