France New Virus sakal
आरोग्य

France New Virus: डोळ्यातून रक्त येऊन होतोय मृत्यू, फ्रान्समध्ये आढळला खतरनाक व्हायरस! ब्रिटनमध्ये हाहाकार

कोरोनापेक्षाही भयंकर! या विषाणूच्या संसर्गामुळे डोळ्यांतून होतो रक्तस्राव

Aishwarya Musale

फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.  त्यामुळे पीडितांच्या डोळ्यांतून रक्त वाहू लागतं. वैज्ञानिकांना भीती आहे की क्रिमियन-कॉंगो रक्तस्रावी फिवर (CCHF) लवकरच ब्रिटनच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतो. फ्रेंचच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, 'हा विषाणू उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पायरेनीस ओरिएंटेलमध्ये टिक्समध्ये आढळून आला आहे, फ्रान्समध्ये आतापर्यंत संसर्गाची एकही घटना दिसली नाही.'

वैज्ञानिकांनी सांगितले की क्रिमियन-कॉंगो रक्तस्रावी ताप हा टिक-जनित रोग आहे. हे मूलतः आफ्रिका, बाल्कन, मध्य पूर्व आशिया आणि आशियासारख्या उष्ण हवामानाच्या ठिकाणी आढळते. डब्ल्यूएचओने सांगितले की दुर्मिळ असूनही,  हा संसर्ग फारच दुर्मीळ असल्याने संसर्ग झालेल्यांपैकी 40 टक्के लोकांची दगावण्याची शक्यता असते.

जुलैमध्ये, ब्रिटिश वैज्ञानिकांनी चेतावणी दिली की हवामान बदलामुळे हा रोग त्याच्या सामान्य क्षेत्राबाहेर आणि युनायटेड किंगडम (यूके) आणि फ्रान्सच्या दिशेने जाऊ शकतो. 2016 ते 2022 दरम्यान स्पेनमध्ये या आजाराची 7 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कॅम्ब्रिज विद्यापीठामधील पशू चिकित्सा विभागाचे प्रमुख प्राध्यापक जेम्स वूड यांनी वैज्ञानिक बैठकीदरम्यान, किटकांच्या माध्यमातूनच सीसीएचएफचा संसर्ग होतो. हा संसर्ग ब्रिटनपर्यंत पोहोचला आहे. असे सांगितले. 'द सन'शी बोलताना लिव्हरपूर विद्यापीठाचे संसर्ग विभागाचे प्राध्यापक पॉल विगले यांनी जेम्स वूड यांच्या मताशी समहती दर्शवली आहे. ब्रिटनमध्ये भविष्यात हा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं पॉल विगले म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT